जेट खरेदीसाठी एडिग्रो एव्हिएशन उत्सुक 

वृत्तसंस्था
Thursday, 9 May 2019

नवी दिल्ली : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचा भांडवली हिस्सा विक्रीसाठीच्या निविदा देण्यासाठी आता एकाच दिवस राहिला आहे. जेट एअरवेजचा हिस्सा खरेदीसाठी एडिग्रो एव्हिएशनने उत्सुकता दर्शविली आहे. एडिग्रो ही लंडन एडिग्रुपचा हिस्सा असून समूहाचे संस्थापक संजय विश्वनाथन यांनी आणखी काही मोठे गुंतवणूकदार आमच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. 

जेट एअरवेजसाठी याआधीच रेडक्लिफ कॅपिटल व आदि पार्टनर्स या दोन व्यावसायिकांनी एकत्रितपणे निविदा भरली असून या निविदा प्रक्रियेची मुदत 10 मे रोजी संपणार आहे. एसबीआय कॅपिटलकडून जेटच्या हिस्सा विक्री प्रकियेचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.  स्टेट बँकेने एतिहाद एअरवेज, टीपीजी कॅपिटल, इंडिगो पार्टनर्स, एनआयआयएफ या चार कंपन्यांना पहिले प्राधान्य दिले असले तरी अजून एकाही कंपनीने निविदा सादर केलेली नाही. 

जेटवर सध्या आठ हजार पाचशे कोटींचे कर्ज आहे. आज मुंबई शेअर बाजारात जेट एअरवेजचा शेअर 12.13 टक्क्यांनी वधारला असून तो 147.40 रुपयांवर व्यवहार करतो आहे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AdiGro Aviation to bid for Jet Airways