आता 'या' बँकेला टाळे...असे मिळवा पैसे परत!

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जुलै 2019

मुंबई: आदित्य बिर्ला न्युवो आणि आयडिया सेल्युलर यांची संयुक्तपणे सुरू केलेल्या 'आदित्य बिर्ला पेमेंट्स बॅंके'ला आपले कामकाज थांबवण्याची वेळ आली आहे. पेमेंट्स बॅंक सुरू केल्यानंतर फक्त 18 महिन्यातच बंद करण्याची नामुष्की आदित्य बिर्ला समूहावर आली आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच 'आदित्य बिर्ला पेमेंट्स बॅंक' बाजारात लॉंच करण्यात आली होती. यामध्ये आदित्य बिर्ला न्युवोचा 51 टक्के आणि आयडिया सेल्युलरचा 49 टक्के हिस्सा होता. 

आदित्य बिर्ला पेमेंट्स बॅंकेने आपल्या ग्राहकांना त्यांचे पैसे 26 पूर्वी काढून घेण्याची सूचना केली आहे. 26 जुलै 2019 नंतर आम्ही ग्राहकांना कोणतीही नवी रक्कम जमा करू देणार नाही, अशी माहिती पेमेंट्स बॅंकेने दिली आहे. ग्राहकांची रक्कम परत करण्यासाठीची सर्व तयारी आणि काळजी कंपनीकडून घेण्यात आली आहे. 'आदित्य बिर्ला पेमेंट्स बॅंकेच्या संचालक मंडळाने स्टॉक एक्सचेंजलासुद्धा 19 जुलैलाच कामकाज थांबवण्यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

कंपनीच्या व्यवसायात आर्थिक अडचणी आल्यामुळे हा उपक्रम पुढे चालवणे व्यवहार्य नसल्यामुळे बंद करण्यात येत असल्याचे कंपनीकडून कळवण्यात आले आहे. डिसेंबर 2018 मध्ये पेमेंट्स बॅंकेने 5.62 कोटी रुपयांचे व्यवहार केले होते. मात्र या क्षेत्रात 'आदित्य बिर्ला पेमेंट्स बॅंकेला एअरटेल पेमेंट्स बॅंक आणि पेटीएम पेमेंट्स बॅंकेकडून मोठ्याच आव्हानाला तोंड द्यावे लागत होते. डिसेंबर 2018 अखेर 'आदित्य बिर्ला पेमेंट्स बॅंकेने एकूण 780 कोटी रुपयांचे व्यवहार हाताळला होता. केवायसीसंदर्भात कडक नियम आणि तीव्र व्यावसायिक स्पर्धा यामुळेच 'आदित्य बिर्ला पेमेंट्स बॅंकेला व्यवसाय गुंडाळावा लागला आहे. ऑगस्ट 2015 मध्ये आदित्य न्युवोला रिझर्व्ह बॅंकेने लायसन्स दिले होते. मात्र त्यांना रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांवलींच्या पूर्तता करून अंतिम लायसन्स मिळवण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. 

कसे मिळवाल पैसे परत? 
जर तुम्ही 'आदित्य बिर्ला पेमेंट्स बॅंकेचे ग्राहक असाल तर पेमेंट्स बॅंकेतील आपले पैसे मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्या बॅंकिंग पॉईंटला भेट देऊ शकता किंवा 18002092265 या नंबर कॉल करू शकता किंवा vcare4u@adityabirla.bank या मेल आयडीवर मेल करू शकता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Birla Payments Bank to wind up