आदित्या बिर्ला सन लाईफचा IPO केव्हा येणार? जाणून घ्या, शेअरचा भाव?

आदित्या बिर्ला सन लाईफचा IPO केव्हा येणार? जाणून घ्या, शेअरचा भाव?

- शिल्पा गुजर

Aditya Birla Sun Life AMC : आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी आयपीओ २९ सप्टेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे तर याचे सबस्क्रिप्शन1 ऑक्टोबर रोजी बंद होईल. यासाठीची अंक इश्यू प्राइस 695-712 रुपये ठेवण्यात आली आहे.

आदित्या बिर्ला सन लाईफचा IPO केव्हा येणार? जाणून घ्या, शेअरचा भाव?
Gold and Silver Price : सोने आणि चांदीच्या भावात घसरण

प्रारंभिक शेअर-विक्री ओपन फॉर सेल आहे, ज्याअंतर्गत आदित्य बिर्ला कॅपिटल आणि सन लाइफ (इंडिया) एएमसी इन्व्हेस्टमेंट्स हे दोन्ही प्रवर्तक (Promoters) मालमत्ता व्यवस्थापन कंपनीतील आपला हिस्सा विकतील. 3.88 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या आयपीओमध्ये आदित्य बिर्ला कॅपिटलद्वारे 28.51 लाख इक्विटी शेअर्स आणि सन लाइफ एएमसीद्वारे 3.6 कोटी इक्विटी शेअर्स विकण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे.

2768 कोटी मिळण्याची आशा

आयपीओमध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल आणि सन लाइफ इंडिया यांनी इक्विटी शेअर्सची प्रस्तावित विक्री आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीचे शेअर भांडवलाच्या 13.50 टक्क्यांपर्यंत असतील. सुरुवातीच्या शेअर-विक्रीतून 2,768.25 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

आदित्या बिर्ला सन लाईफचा IPO केव्हा येणार? जाणून घ्या, शेअरचा भाव?
दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव गाठणार विक्रमी पातळी

निप्पॉन लाइफ, एचडीएफसी एएमसीसारख्या कंपन्या आधीच लिस्टेड

आदित्य बिर्ला हा सन लाइफ एएमसी, आदित्य बिर्ला ग्रुप आणि कॅनडाचा सन लाइफ फायनान्शियल इंक यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. निप्पॉन लाइफ इंडिया अॅसेट मॅनेजमेंट, एचडीएफसी एएमसी आणि यूटीआय एएमसी सारख्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आधीच स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड आहेत.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35% सुरक्षित

आयपीओचा निम्मा भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (Qualified Institutional Buyers), किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के आणि उर्वरित 15 टक्के बिगर - संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. गुंतवणूकदार किमान 20 इक्विटी शेअर्ससाठी आणि नंतर 20 इक्विटी शेअर्सच्या गुणकांमध्ये (Multiple) बोली लावू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com