
जर तुम्ही Advance Tax भरला नाहीतर तुम्हाला दरमहा एक टक्का व्याजासह एक हप्ता भरावा लागेल.
करदात्यांसाठी आवश्यक बातमी आहे. जर तुम्ही अजून अॅडव्हान्स टॅक्स (Advance Tax) जमा केला नसेल, तर तो लवकर करा. आर्थिक वर्ष 2021-22 साठी अॅडव्हान्स टॅक्स (advance tax instalments) जमा करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे. जर तुम्ही Advance Tax भरला नाहीतर तुम्हाला दरमहा एक टक्का व्याजासह एक हप्ता भरावा लागेल.
अॅडव्हान्स टॅक्स चार हप्त्यांमध्ये जमा करावा लागेल-
करदात्यांना एका वर्षात कमाईवर चार हप्त्यांमध्ये अॅडव्हान्स टॅक्स जमा करावा लागतो. चार हप्त्यांपैकी हा शेवटचा हप्ता असेल. कर कायद्यानुसार करदात्यांना अंदाजे कर वार्षिक १५ टक्के, ४५ टक्के, ७५ टक्के आणि १०० टक्के या हप्त्यांमध्ये भरावा लागतो. हे चार हप्ते १५ जून, १५ सप्टेंबर, १५ डिसेंबर आणि १५ मार्चपर्यंत भरायचे आहेत.
अॅडव्हान्स टॅक्स भरणे कोणासाठी आवश्यक?-
आर्थिक वर्षात ज्या व्यक्तीचे अंदाजे करदायित्व (टॅक्स लायबिलीटी) दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक असेल, त्याला अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. हे सर्व करदात्यांना लागू होते. एक लक्षात घ्या की, ज्या व्यक्तीच्या कमाईचा स्रोत दुसरा कोणी नसून पगार असतो. त्यामुळे ते अॅडव्हान्स टॅक्सच्या हप्त्यांमध्ये भरण्याची गरज नाही. कारण त्याची कंपनी हा टॅक्स कर्मचाऱ्याच्या पगारातून कापून टॅक्स डिपार्टमेंटकडे जमा करते.
आपण अॅडव्हान्स टॅक्स भरण्यापासून चूक केल्यास काय होईल? -
करदात्याने निर्धारित वेळेपर्यंत आपला अॅडव्हान्स टॅक्स जमा न केल्यास त्याला तीन महिन्यांच्या हप्त्यासह भराव्या लागणाऱ्या रकमेवर कलम 234C अंतर्गत दरमहा एक टक्का व्याज आकारले जाते.
असा जमा करा अॅडव्हान्स टॅक्स-
- आपण ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे आगाऊ कर भरू शकता.
- त्याचा भरणा ऑफलाइन करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने अधिकृत केलेल्या बँका शाखांमध्ये कर भरणा चलन (चलन क्रमांक २८०) वापरू शकतात.
- त्याचबरोबर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आयकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in वेबसाइटवर लॉग इन करा आणि ई-पे टॅक्सवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) वेबसाइटवर निर्देशित केले जाईल.
- चलन क्रमांक २८० वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि पेमेंट करा.
लाभांश करातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही कर -
एखाद्या व्यक्तीच्या लाभांशातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही कर आकारणी होऊ लागली आहे. तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबच्या आधारे हा कर आकारला जाईल. आर्थिक वर्षात तुमच्या डिव्हिडंडमधून मिळणारी कमाई 5000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला टीडीएस आकारला जाईल. अशा लोकांसाठी आगाऊ कर भरणा करण्याची शेवटची तारीख 15 मार्च आहे, जी विसरली गेल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.