esakal | पेट्रोल 2.50 तर डिझेल 2.78 रुपयांनी महागलं, पाहा आजचे दर
sakal

बोलून बातमी शोधा

पेट्रोल

पेट्रोल 2.50 तर डिझेल 2.78 रुपयांनी महागलं, पाहा आजचे दर

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Petrol, Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे (Petrol Diesel Price) सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चटका बसत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (Oil PSUs) आज, मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. पेट्रोलची किंमत प्रतिलीटर (Petrol Price) 24 ते 27 पैशांनी वाढली आहे. तर डिझेलची किंमत (Diesel) भी 27 ते 31 पैसे प्रति लीटरनं वाढवण्यात आली आहे. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ऑल टाइम हाय आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ पाहायला मिळत आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. इंदौर, भोपाळ, परभणी आणि जयपुरसह इतर काही शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 100 च्या पुढे गेली आहे. (After a day petrol diesel price again hiked know the price in your city)

पेट्रोल 2.50 तर डिझेल 2.78 रुपयांनी महागलं

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ होताताना दिसत आहे. निवडणूकीच्या निकालानंतर 11 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ पाहायला मिळाली. 11 दिवसांत पेट्रोल 2 रुपये 50 पैशांनी महागलं आहे. याच कालावधीत डिझेलच्या दरांतही सातत्यानं वाढ झाल्याचं पाहायला मिळाली. 11 दिवसांत डिझेल 2.78 रुपयांनी महागलं आहे.

प्रमुख शहरांतील पेट्रोलचे प्रतिलीटर दर-

दिल्ली - 92.85

मुंबई - 99.14

कोलकाता - 92.92

चेन्नई - 94.54

प्रमुख शहरांतील डिझेलचे प्रतिलीटर दर-

दिल्ली - 83.51

मुंबई - 90.71

कोलकाता - 86.35

चेन्नई - 88.34

हेही वाचा: 'मोदी सरकार इतकं असंवेदनशील कसं असू शकतं' : दिल्ली हायकोर्ट


आपल्या शहरात काय आहेत भाव?

पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.

दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात.