esakal | 'मोदी सरकार इतकं असंवेदनशील कसं असू शकतं' : दिल्ली हायकोर्ट

बोलून बातमी शोधा

Oxygen Crisis

सुप्रीम कोर्टाने ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. असे न झाल्यास हा कोर्टाचा अपवान होईल.

'मोदी सरकार इतकं असंवेदनशील कसं असू शकतं' : दिल्ली हायकोर्ट
sakal_logo
By
वृत्तसंस्था

Fight with Corona : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाचा (Corona Pandemic) प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. त्यामुळे तेथे ऑक्सिजनचंही (Oxygen) संकट निर्माण झालं आहे. देशभरात केंद्र सरकार कोरोनाबाबत उचलत असलेल्या पावलांवर न्यायालये लक्ष ठेवून आहेत. मंगळवारी पुन्हा या विषयावर सुनावणी झाली. यावेळी दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) ऑक्सिजनच्या निर्माण झालेल्या संकटावरून केंद्र सरकारला फटकारले आहे. (Delhi High Court pulls up central govt over oxygen crisis)

तुम्ही अंध होऊ शकता, आम्ही नाही

तुम्ही अंध होऊ शकता, पण आम्ही डोळे मिटू शकत नाही. दिल्लीत अनेकांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही तुम्ही इतके असंवेदनशील कसे काय होऊ शकता. दिल्ली सरकार वारंवार तक्रार करत आहे, याचा अर्थ ते फक्त वायफळ बडबड करत आहे असा होत नाही. दिल्ली सरकारने केंद्राकडे ५९० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली होती. महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे, तर तिकडचे टँकर दिल्लीसाठी पाठवावेत, असा सल्लाही कोर्टानं दिला आहे.

हेही वाचा: अदर पूनावालांची युकेमध्ये २४० मिलियन पौंडची गुंतवणूक

एमिकस राजशेखर राव यांनी हायकोर्टाला सांगितले की, पुढील ३ ते ४ दिवसांत ४८० ते ५२० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल. तसेच पुढील सात दिवसांत ५५० ते ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन आपल्याकडे असेल. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे यासाठी काम करत आहेत. काही दिवसांसाठी १०० मेट्रिक टन ऑक्सिजन दिल्लीत राखीव कोट्यात ठेवला तर भविष्यात आपत्कालीन वेळेत त्याचा वापर होऊ शकतो.

केद्र सरकार जबाबदार

सुप्रीम कोर्टाने ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. असे न झाल्यास हा कोर्टाचा अपवान होईल. ते कसं करायचं हे तुमचं काम आहे. टँकर उपलब्ध आहेत, पण तुम्हीच यासाठी तयार नसल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: IPL 2021 : बायो-बबलचा फुगा फुटला; या हंगामाचा 'खेळ खल्लास'

IIT आणि IIM कडे टँकर सोपवा, ते चांगले काम करतील

केंद्राच्यावतीने एएसजी चेतन शर्मा म्हणाले की, आम्ही आपला अनुपालन अहवाल सर्वोच्च न्यायालयात आज दाखल करीत आहोत. ४३३ मेट्रिक टन ऑक्सिजन मध्यरात्रीच दिल्लीत पोहोचला आहे. सकाळी ८ वाजून १५ मिनिटांपर्यंत ३०७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. संध्याकाळपर्यंत दिल्लीत पुरेसा ऑक्सिजन असेल, अशी अपेक्षा करतो. केंद्र सरकारने ऑक्सिजनचे टँकर IIT आणि IIM या संस्थांकडे द्यावेत, ते चांगले काम करतील, असेही कोर्टाने म्हटले आहे.

हेही वाचा: लॉकडाऊनमध्ये दारुचे दर वाढले; UP सरकारचा मोठा निर्णय

संपूर्ण देश ऑक्सिजनसाठी रडतोय

आज पूर्ण देश ऑक्सिजनसाठी रडतोय. भविष्यात तुम्ही कसा ऑक्सिजनचा पुरवठा कराल हे माहित नाही. केंद्राने ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात IIMच्या विशेषज्ज्ञांची मदत घ्यावी, असा सल्लाही हायकोर्टाने दिला आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.