मार्चनंतर पहिल्यांदा सोनं झालं स्वस्त; रुपया घसरला

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 27 September 2020

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जागतिक अर्थव्यवस्था पुर्वपदावर येण्यास मोठ्या अडचणी येत आहेत, याचं मोठं उदाहरण म्हटलं तर युरोपीय देश. कारण याकाळात बऱ्याच देशात लॉकडाउन असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. आयात-निर्यातवरही मोठा परिणाम झाला आहे.

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात सोने आणि चांदीच्या  (Gold-Silver Price) किंमतीत मोठी प्रमाणात घट दिसून आली आहे. मार्च महिन्यानंतर ही सगळ्यात मोठी घट मानली जात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत (Global Eonomy) याकाळात मोठी पडझड दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे याकाळात अमेरिकन डॉलर वधारल्याचं दिसून आलं आहे. यामुळे आता सोन्याची मागणी कमी  (Gold Demand) झाली आहे. 

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जागतिक अर्थव्यवस्था पुर्वपदावर येण्यास मोठ्या अडचणी येत आहेत, याचं मोठं उदाहरण म्हटलं तर युरोपीय देश. कारण याकाळात बऱ्याच देशात लॉकडाउन असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. आयात-निर्यातवरही मोठा परिणाम झाला आहे.

सप्टेंबरमध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

डॉलरच्या किंमती वाढतील-
गेल्या आठवड्यात सोने 4.6 टक्क्यांनी तर चांदीच्या दरात 15 टक्क्यांची घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते डॉलरमधील वाढीमुळं सोन्याचे दर कमी होत आहेत, तसेच पुढील आठवड्यात इतर चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये गेल्या सहा महिन्यांतील सर्वात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

 ...तर PM किसान योजनेचे 6000 रुपये परत घेतले जाणार

प्लॅटिनमच्या किंमतीही झाल्या कमी-
अमेरिकन सिनेटमधेय आता पुढील 2.5 लाख डॉलर्सच्या प्रोत्साहन पॅकेजवर (US Stimulus Package) चर्चा करत आहे. हे विधेयक पुढच्या आठवड्यात मंजूर होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणजे सोने-चांदीबरोबरच प्लॅटिनमच्या भावातही मोठी घसरण दिसून येत आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही गुंतवणूकदार आता सावध दिसत आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका आणि सीमावादाच्या तणावामुळे (Geo-Political Tension) जगभरात आर्थिक अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

देशांतर्गत बाजारपेठेतही सोन्याच्या किंमतीत घट-
देशांतर्गत बाजारपेठेत शुक्रवारी सोन्याचे वायदे 238 रुपयांनी घसरून 49 हजार 660 रुपये प्रति १० ग्रॅम झाले. याकाळात सोने तसेच चांदीही घसरली आहे. चांदी सुमारे 1 टक्क्याने घसरून 59 हजार 18 रुपये प्रति किलो झाली. दर आठवड्याला सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 2 हजार रुपयांनी घसरले तर चांदी प्रति किलो 9 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

(edited by-pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after march first time biggest gold slumps and doller rate incresed