विमान प्रवाशांसाठी वाईट बातमी; SpiceJet चं तिकीट महागणार; जाणून घ्या किती होणार किंमत?

Air Fare Price Hike
Air Fare Price Hike esakal
Summary

विमान प्रवाशांसाठी ही एक वाईट बातमी आहे.

Air Fare Price Hike : विमान प्रवाशांसाठी एक वाईट बातमी आहे. एव्हिएशन इंधनाच्या (Aviation Fuel) वाढत्या किमती आणि रुपयाचं घसरलेलं मूल्य यामुळं विमान तिकीट महाग होणार आहे. स्पाइसजेटचे (SpiceJet) चेअरमन आणि एमडी अजय सिंह (Ajay Singh) यांनी सांगितलं की, एव्हिएशन टर्बाइन इंधनच्या किमती वाढल्यानं आमच्याकडं फ्लाइट तिकिटांचं भाडं वाढवण्याशिवाय पर्याय उरला नाहीय. विमानाचा खर्च अधिक चांगला ठेवण्यासाठी हवाई भाड्यात (Air Fare) किमान 10-15 टक्के वाढ करण्याची गरज आहे.

ते पुढं म्हणाले, जून 2021 पासून एटीएफच्या किमती 120 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. ही वाढ शाश्वत नाहीय आणि एटीएफवरील (ATF) कर कमी करण्यासाठी सरकार, केंद्र आणि राज्यांनी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे. स्पाइसजेटनं गेल्या काही महिन्यांत इंधनाच्या किमतीतील या वाढीचा जास्तीत-जास्त भार उचलण्याचा प्रयत्न केलाय, जो आमच्या ऑपरेशन खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या कमकुवतपणाचा एअरलाइन्सवर आणखी परिणाम झालाय. कारण, आमच्याकडं मोठ्या प्रमाणात खर्च आहे.

Air Fare Price Hike
PHOTO : अग्निपथ योजनेविरोधात बिहार, राजस्थानात तरुण आक्रमक

एटीएफच्या किमती पुन्हा एकदा 16 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यानंतर एटीएफच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. आजपासून एटीएफची किंमत 19757.13 रुपये प्रति किलो लीटरनं वाढून 141232.87 रुपये प्रति किलो लीटर झालीय. तर, 1 जून रोजी एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या (ATF) किमतीत सुमारे 1.3 टक्के दिलासा देण्यात आला होता. इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये एटीएफच्या किमती 1,563.97 रुपयांनी कमी झाल्या आहेत. 1 जून रोजी दिल्लीत जेट इंधनाची किंमत 121,475.74 रुपये प्रति किलो लीटर होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com