एअर इंडिया इमारतीची ‘जेएनपीटी’ला विक्री

पीटीआय
गुरुवार, 28 जून 2018

नवी दिल्ली - आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियाला तारण्यासाठी कंपनीच्या मालकीची दक्षिण मुंबईतील दिमाखदार इमारत विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नरिमन पॉइंट येथील २३ मजली ‘एअर इंडिया बिल्डिंग’ची जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला (जेएनपीटी) विक्री करण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राथमिक मंजुरी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एअर इंडियातील हिस्सा विक्री करून कर्जे कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न होता, मात्र हिस्सा खरेदीला इतर कंपन्यांनी अनुत्सकता दाखवल्याने हा प्रस्ताव सरकारला गुंडाळावा लागला होता. 

एअर इंडियावरील कर्जाचा बोजा ५० हजार कोटींवर गेला आहे. कंपनीला आर्थिक पाठबळाची आवश्‍यकता ओळखून एअर इंडियाच्या मालमत्तेच्या विक्रीचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

Web Title: Air India Building Sale to JNPT