पाकमुळे एअर इंडियाला कोट्यवधींचा तोटा 

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

 नवी दिल्ली:  पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्याने एअर इंडियाला चार महिन्यांत 430 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्याने एअर इंडियाच्या विदेशात जाणाऱ्या विमानांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत होता. 

 नवी दिल्ली:  पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्याने एअर इंडियाला चार महिन्यांत 430 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्याने एअर इंडियाच्या विदेशात जाणाऱ्या विमानांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत होता. 

बालाकोटमधील हल्ल्यानंतर पाकिस्तानने हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काल (ता. 16) पाकिस्तानने चार महिन्यांनंतर हवाई हद्द खुली केली. याविषयी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नावर नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, इंधनावरील वाढलेला खर्च, पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्याने आणि भू-राजकीय मुद्द्यांमुळे एअर इंडियाच्या कामकाजावरील खर्च 40 टक्के आहे. पाकिस्ताने आता हवाई हद्द खुली केली, ही समाधानाची बाब आहे. मागील चार महिने पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्याने कंपनीला 430 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. 

एअर इंडियाचे खासगीकरण करण्यास सरकार कटिबद्ध आहे. परंतु, कंपनीचे खासगीकरण करण्याआधी तिला नफ्यात आणण्याच्या योजनेवर सरकार काम करीत आहे. या वर्षअखेर एअर इंडियाचा कार्यान्वयन तोटा 74 कोटी रुपये असेल आणि पुढील वर्षापासून कंपनी नफ्यात येईल, असे पुरी यांनी सांगितले. सध्या एअर इंडियाचे एकूण 1,677 कर्मचारी आहेत. त्यामध्ये कायमस्वरूपी 1,108 तर कंत्राटी स्वरूपावर 569 कर्मचारी काम करतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air India suffered 430 cr loss due to Pakistan air space closure