एअर इंडियाचे होणार १०० टक्के खासगीकरण

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

केंद्र सरकारने एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियासोबतच तिची सहाय्यक कंपनी एअर इंडिया एक्‍स्प्रेसचेही खासगीकरण केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे.​

नवी दिल्ली - केंद्र सरकारने एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियासोबतच तिची सहाय्यक कंपनी एअर इंडिया एक्‍स्प्रेसचेही खासगीकरण केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे.

राज्यसभेत बोलताना पुरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की केंद्र सरकारच्या निर्गुंतवणुकीकरणाच्या धोरणानुसार एअर इंडिया, एअर इंडिया एक्‍सप्रेस यांचे १०० टक्के खासगीकरण आणि त्यातील सरकारी हिस्सा पूर्णपणे विकण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्‍सप्रेसमधील १०० टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या मालकीचा आहे. एअर इंडियामधील २४ टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या ताब्यात ठेवण्याच्या निर्णयामुळे याआधी केलेल्या खासगीकरणाच्या प्रयत्नात यश आले नव्हते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air India will have 100 percentage Privatization