एअर इंडियाचा इंधन पुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 August 2019

देणी थकवल्याने तेल वितरक कंपन्यांनी एअर इंडियाचा पुण्यासह पाच विमानतळांवरील इंधन पुरवठा खंडित केला आहे.

 

नवी दिल्ली: देणी थकवल्याने तेल वितरक कंपन्यांनी एअर इंडियाचा पुण्यासह पाच विमानतळांवरील इंधन पुरवठा खंडित केला आहे. यामुळे कंपनीच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. तेल वितरक कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या "इंडियन ऑईल'ने पुणे, रांची, मोहाली, पटना, विशाखापट्‌टणम आणि कोची या सहा विमानतळावरील एअर इंडियाचा तेलपुरवठा गुरुवारी संध्याकाळपासून खंडित केला असल्याचे कंपनीच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. एअर इंडियाने तेल वितरकांना 60 कोटी दिले आहेत. मात्र थकबाकीसाठी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा सुरू असल्याचे "इंडियन ऑईल'ने म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air India's fuel supply breaks down