जिओशी एअरटेलची टक्कर; नवीन वर्क फ्रॉम होम ऑफर

वृत्तसंस्था
Wednesday, 20 May 2020

एअरटेलकडून ही ऑफर रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. लॉकडाउन असल्याने जे ग्राहक वर्क फ्रॉम होम काम करत आहेत त्यांच्यासाठी एअरटेलने ही ऑफर बाजारात आणल्याचे समजते.

मुंबई : देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखली जाणारी भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन डेटा ऑफर आणली आहे. कंपनीच्या या नवीन ऑफरनुसार २५१ रुपयांच्या रिचार्ज वाउचर मध्ये ५० जीबी डेटा मिळणार आहे. एअरटेलकडून ही ऑफर रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच खासकरून सध्याच्या परिस्थिती मध्ये लॉकडाउन असल्याने जे ग्राहक वर्क फ्रॉम होम काम करत आहेत त्यांच्यासाठी एअरटेलने ही ऑफर बाजारात आणल्याचे समजते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एअरटेलच्या या २५१ रुपयांच्या रीचार्ज वाउचर प्लॅनवर ५० जीबी डेटाची ऑफर आहे. पण हा केवळ डेटा प्लॅन असून, त्यामुळे या ऑफरमध्ये केवळ डेटा वापरण्यास मिळेल. मोफत कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा ग्राहकांना मिळणार नाही. आणि या नवीन पॅकवर कोणताही डेटा कॅप देखील नाही त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार 50 जीबी वापरण्याची परवानगी आहे. तर या पॅकची व्हॅलिडिटी पूर्वीच्या बेस पॅक इतकीच असणार आहे. 

पिंपरीच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिवाय एअरटेलने आपल्या ९८ रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये बदल करत या पॅकची २८ दिवसांची व्हॅलिडिटी काढून टाकली आहे. त्यामुळे या पॅकची व्हॅलिडिटी देखील पूर्वीच्या बेस पॅक इतकीच असणार आहे. शिवाय ग्राहकांना ६ जीबी ऐवजी १२ जीबी डेटा दुप्पट मिळणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यापूर्वी रिलायन्स जिओने देखील वर्क फ्रॉम होम काम करणाऱ्या ग्राहकांसाठी अशीच ऑफर आणली होती. यामध्ये २५१ रुपयाच्या वाउचर मध्ये ५० जीबी डेटा ग्राहकांसाठी उपलब्ध करून  देण्यात आला होता.रिलायन्स जिओच्या या ऑफरमध्ये देखील मोफत कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा देण्यात आली नव्हती. मात्र या पॅकची व्हॅलिडिटी ३० दिवसांकरिता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Airtel launched offer for customers who are working from home due to lockdown