देशाला 'आधार' देणारे अजय भूषण पांडे नवे अर्थ सचिव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : देशाच्या अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते अर्थ सचिव हसमुख आधिया यांनी त्यांच्या कार्यालयात स्वागत केले. पांडे हे महाराष्ट्र केडरच्या 1984 बॅचचे अधिकारी असून, आधार (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया)चे (यूआयडीएआय) या सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

देशात बायोमेट्रिक ओळखपत्र म्हणून आधार विकसित करण्यात अजय भूषण पांडे यांचा मोठा सहभाग आहे. मागील 8 वर्षांपासून ते प्रोजेक्टशी संलग्न आहेत. त्याचबरोबर आधारला बँक खात्याशी जोडून सर्वसामान्य नागरिकाला सरकारी फायदे मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. आधारकार्डचे महत्व सर्वोच्च न्यायालयात पटवून देण्यात देखील त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. 

अजय भूषण पांडे हे आयआयटी कानपूरच्या इलेक्ट्रिकल शाखेचे विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहताना त्यांनी ट्रान्समिशन व वितरणात होणारी गळती थांबविण्यासाठी मोठ्या उपाययोजना राबविल्या होत्या.

तसेच महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सचिव म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांना चालना देण्याचे काम त्यांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajay Bhushan Pandey Elected as new finance secretary