esakal | Amazon चा चीनला दणका; तीन ब्रँडच्या विक्रीवर घातली बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

amazon

ई-कॉमर्समधील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉनने तीन चायनिज ब्रँडवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या तीन चायनिज ब्रँड्सना अ‍ॅमेझॉनच्या प्लॅटेफॉर्मवर आपल्या वस्तू विकता येणार नाहीत.

Amazon चा चीनला दणका; तीन ब्रँडच्या विक्रीवर घातली बंदी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- ई-कॉमर्समधील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉनने तीन चायनिज ब्रँडवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या तीन चायनिज ब्रँड्सना अ‍ॅमेझॉनच्या प्लॅटेफॉर्मवर आपल्या वस्तू विकता येणार नाहीत. अ‍ॅमेझॉनने RAV पॉवर बँक्स (RAVPower power banks), टावट्रोनिक्स इअरफोन (Taotronics earphones) आणि VAVA कॅमेऱ्यांच्या (VAVA cameras) विक्रीवर बंदी आणली आहे. चीनला सध्या जागतिक व्यापारात पीछेहाट सहन करावी लागत आहे. अमेरिकेने अनेक चिनी वस्तूंवर बंदी आणली आहे, त्यात अॅमेझॉनच्या या कारवाईने चीनला फटका बसणार आहे. शेनझांनमधील इलेट्रॉनिक्स कंपनी सनव्हॅलीचे हे प्रोडक्ट्स असल्याचं सांगण्यात आलंय. (Amazon bars three Chinese brands from selling on its platform)

चायनिज ब्रँडचे व्यापारी ग्राहकांना चांगला रिव्हिव्हू देणाऱ्या ग्राहकांना गिफ्ट कार्ड देत होते. चीनमधील ई-कॉमर्स कंपन्यांसाठी ही सर्वसामान्य बाब आहे. पण, अ‍ॅमेझॉन कंपनीच्या पॉलिसीनुसार रिव्हिव्हू पद्धतीवर प्रभाव पाडण्याचा हा एक प्रकार आहे. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलंय. अ‍ॅमेझॉन कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलंय की, काही प्रोडक्ट ग्राहकांना गिफ्ट कार्ड देत होते, जे की कंपनीच्या पॉलिसिचे उल्लंघन आहे.

हेही वाचा: अ‍ॅलोपॅथीप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य; रामदेव बाबांची सुप्रीम कोर्टात धाव

सनव्हॅली कंपनी इलेक्टॉनिक्स वस्तूंची विक्री अ‍ॅमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरुन करते. यात लहान मुलांवर लक्ष ठेवणारे कॅमेरे, पॉवर बँक्स यांचा समावेश होतो. माहितीनुसार, सनव्हॅली कंपनीच्या एकतृतीयांश वस्तूंची विक्री अ‍ॅमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरुन केली जात होती. त्यामुळे कंपनीसाठी हा मोठा फटका असणार आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील ई-कॉमर्स कंपनी behemoth ने ByteDance पुरस्कृत एका ऑनलाईन स्टोअरवर बंदी आणली होती.

हेही वाचा: शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचे महत्व काय?

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अ‍ॅमेझॉन कंपनी कठोर कारवाई करत असते. यावेळी कोणतीही सबब ऐकून घेतली जात नाही. सकारात्मक रिव्हिव्हूसाठी गिफ्ट कार्ड देणे किंवा मित्राला चांगले रिव्हिव्हू देण्यास सांगणे कंपनीच्या दृष्टीने नियमांचे उल्लंघन आहे. अ‍ॅमेझॉनने यावेळी एका मोठ्या कंपनीच्या ब्रँड्सवर बंदी आणली आहे. त्यामुळे यातून कठोर संदेश देण्याचा कंपनीचा हेतू दिसतोय.

loading image