जेफ बेझोस विकताय अॅमेझॉनचे शेअर... का?

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

अॅमेझॉन डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफ बेझोस यांनी कंपनीतील आपल्या मालकीच्या 2.8 अब्ज डॉलर मूल्याच्या शेअरची विक्री केली आहे.

वॉशिंग्टन: अॅमेझॉन डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफ बेझोस यांनी कंपनीतील आपल्या मालकीच्या 2.8 अब्ज डॉलर मूल्याच्या शेअरची विक्री केली आहे. गुरूवारी आणि शुक्रवारी जेफ बेझोस यांनी 99 कोटी डॉलर मूल्याच्या शेअरची विक्री केली होती. जुलैच्या शेवटच्या तीन दिवसांत त्यांनी 1.8 अब्ज डॉलर मूल्याच्या शेअरची विक्री केली होती. 

गेल्या आठवडयात त्यांनी विक्री केलेल्या एकूण शेअरचे मूल्य 2.8 अब्ज डॉलरवर पोचले आहे. याआधी जेफ बेझोस यांनी शेअरची विक्री करण्याचा आपला प्लॅन असल्याचे असल्याचे सांगितले होते. दरवर्षी 1 अब्ज डॉलर मूल्याच्या शेअरची दरवर्षी विक्री करून त्यांच्या ब्ल्यू ओरिजिन या रॉकेट कंपनीसाठी भांडवल उभारण्याचा त्यांचा विचार आहे. जेफ बेझोस यांची घटस्फोटीत पत्नी मॅकेन्झी बेझोस यांच्याकडे अॅमेझॉनचे 37 अब्ज डॉलर मूल्याचे शेअर आहेत. त्यामुळे त्या अॅमेझॉनच्या शेअरची मालकी असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्ती आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon CEO Jeff Bezos has sold roughly $2.8 billion worth of stock