घटस्फोटासाठी त्यांनी मोजले चक्क 2 लाख 60 हजार कोटी

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

जगातील सर्वात मोठी ऑनलाईन रिटेलर कंपनी असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक यांनी पत्नीला दिलेल्या घटस्फोटाच्या तडजोडीसाठी तब्बल 38 अब्ज डॉलर (2 लाख 60 हजार कोटी रुपये) मोजले आहेत. जेफ बेझोस यांनी आपली पत्नी मॅकेन्झी बेझोझ यांना घटस्फोट दिला आहे. सिएटल येथील कोर्टात या संदर्भातील अंतिम सुनावणी झाली. घटस्फोटाच्या तडजोडीसाठी जेफ बेझोझ यांना तब्बल 38.3 अब्ज डॉलर मोजावे लागणार आहेत. अर्थातच ही रक्कम रोकडच्या स्वरुपाता नसून अॅमेझॉन डॉट कॉम या कंपनीचे 38.3 अब्ज डॉलर मूल्याचे शेअर जेफ बेझोझ यांना आपल्या माजी पत्नीच्या मालकीचे करावे लागणार आहेत.

जगातील सर्वात मोठी ऑनलाईन रिटेलर कंपनी असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक यांनी पत्नीला दिलेल्या घटस्फोटाच्या तडजोडीसाठी तब्बल 38 अब्ज डॉलर (2 लाख 60 हजार कोटी रुपये) मोजले आहेत. जेफ बेझोस यांनी आपली पत्नी मॅकेन्झी बेझोझ यांना घटस्फोट दिला आहे. सिएटल येथील कोर्टात या संदर्भातील अंतिम सुनावणी झाली. घटस्फोटाच्या तडजोडीसाठी जेफ बेझोझ यांना तब्बल 38.3 अब्ज डॉलर मोजावे लागणार आहेत. अर्थातच ही रक्कम रोकडच्या स्वरुपाता नसून अॅमेझॉन डॉट कॉम या कंपनीचे 38.3 अब्ज डॉलर मूल्याचे शेअर जेफ बेझोझ यांना आपल्या माजी पत्नीच्या मालकीचे करावे लागणार आहेत. एप्रिल महिन्यात जेफ बेझोझ यांनी यासंदर्भातील खुलासा करत सांगितले होते की घटस्फोट झाल्यानंतर ते पत्नीच्या नावे कंपनीच्या एकूण शेअरपैकी 4 टक्के म्हणजेच 1 कोटी 97 लाख शेअर करणार आहेत.

जानेवारी महिन्यात बेझोझ दाम्पत्याने ट्विटरच्या माध्यमातून पहिल्यांदाच घटस्फोटाची वाच्यता केली होती. यामुळे अर्थात जेफ बेझोझ यांचा कंपनीवरील मालकी हक्क कमी होणार आहे. मात्र घटस्फोटाच्या तडजोडीपोटी इतकी प्रचंड संपत्ती मोजूनसुद्धा घटस्फोटानंतरही सध्या अॅमेझॉनच्या एकूण शेअरपैकी 12 टक्के शेअर आहेत. त्यांच्या शेअचे बाजारमूल्य 114.8 अब्ज डॉलर ( जवळपास 7 लाख 88 हजार 331 कोटी रुपये) इतके प्रचंड आहे. त्यामुळेच ते अजूनसुद्धा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या किताबावर कायम आहेत. त्यांच्या पत्नी मॅकेन्झी आपल्याला मिळणाऱ्या संपत्तीच्या निम्मे संपत्ती समाजपयोगी दान करणार आहेत. 2010 मध्ये बिल गेट्स आणि वॉरन बफे यांनी गिव्हिंग प्लेज ही मोहिम चालवली होती. त्यात जगभरातील अनेक धनिक सहभागी झाले होते. मॅकेन्झीसुद्धा त्यात सहभागी होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon founder Jeff Bezos' divorce final with $38 billion settlement