Hurry, खरेदी करायची मग ऍमेझॉनचा फ्रीडम सेल आहे ना!

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

ऍमेझॉनने आणलेल्या फ्रीडम सेलला उद्या अखेरचा दिवस आहे

नवी दिल्लीः ऍमेझॉनने आणलेल्या फ्रीडम सेलला उद्या अखेरचा दिवस आहे. स्वातंत्र दिनाचे औचित्य साधत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऍमेझॉनने 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान फ्रीडम सेल आयोजित करण्यात आला आहे. ऍमेझॉनने  स्मार्टफोन, मोबाईल ऍक्सेसरीजवर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या सवलती देऊ केल्या आहेत. शिवाय ग्राहकांच्या आवडीचे स्मार्टफोन असलेल्या वनप्लस, सॅमसंग, अॅपलवर देखील ऑफर्स देऊ केल्या आहेत. 

एसबीआयच्या ग्राहकांना विशेष लाभ मिळणार असून फ्रीडम सेलमध्ये कार्डवर 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. 

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत 
टी.व्ही आणि एसीवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली आहे. त्याचबरोबर विविध ब्रँडच्या फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर मोठी सूट देण्यात आली आहे. तसेच हेडफोन्स आणि स्पीकरवर 60 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.

स्मार्टफोनवर खास ऑफर 
सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी 10वर एक्सचेंज ऑफरवर सहा हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. शिवाय सॅमसंग गॅलेक्सी नोट9च्या खरेदीवर एक्सचेंजची सूट देण्यात आली असून जुना फोन देऊन 6 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळवता येणार आहे. हुवाई पी3 प्रो सारख्या स्मार्टफोनच्या खरेदीवर लेटेस्ट हुवाई वॉच वॉच मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon Freedom Sale 2019 Everything you need to know