Amazon Layoffs: ट्विटर, मेटानंतर अ‍ॅमेझॉनही देणार १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ! वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amazon layoff after twitter meta amazon preparation for layoffs 10000 people this week

Amazon Layoffs: ट्विटर, मेटानंतर अ‍ॅमेझॉनही देणार १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ! वाचा सविस्तर

जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरूच आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स जगतातील दिग्गज कंपनीने आर्थिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर नोकर कपात सुरू केली आहे. Amazon.com Inc या आठवड्याच्या सुरूवातीपासून कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान विभागातील सुमारे 10,000 लोकांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे. न्यूयॉर्क टाइम्सने सोमवारी याबद्दलचे वृत्त दिले आहे. या रिपोर्टनुसार ही नोकर कपात कंपनीच्या डिव्हाइसेस युनिटमध्ये असेल, ज्यामध्ये व्हॉईस-असिस्टंट अलेक्सा, तसेच त्यांचे रिटेल डिव्हीजन आणि मानवी संसाधन यांचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत, Amazon मध्ये अंदाजे 1,608,000 पूर्णवेळ आणि अर्धवेळ कर्मचारी होते. दरम्यान सध्या Amazon ही देखील इतर अमेरिकन कंपन्यांच्या गटात सामील झाली आहे, ज्यांच्याकडून संभाव्य आर्थिक मंदीची भरपाई करण्यासाठी कर्मचारी कपात केली जात आहे. गेल्या आठवड्यात Facebook (मेटा) ने सांगितले होते की ते खर्च कमी करण्यासाठी 11,000 पेक्षा जास्त नोकऱ्या कमी करतील.

हेही वाचा: Delhi Murder Case: Dating App, लिव्ह इन.. शेवटी ३५ तुकडे; वसईच्या तरुणीच्या हत्येचा असा झाला उलगडा

अॅमेझॉनमध्ये काम करणार्‍या कर्मचारी जेमी झांग यांनी काही दिवसांपूर्वी लिंक्डइनवर एका पोस्टमध्ये दावा केला होता की, कंपनीने त्यांना काढून टाकले आहे. या पोस्टमध्ये संपूर्ण रोबोटिक्स टीमला पिंक स्लिप देण्यात आली होती असे म्हटले आहे. लिंक्डइन डेटानुसार, अॅमेझॉनच्या रोबोटिक्स टीममध्ये किमान 3766 कर्मचारी आहेत. पोस्टमध्ये झांग यांनी लिहिले की आमची संपूर्ण रोबोटिक्स टीम गेली आहे. मात्र, या 3766 कर्मचाऱ्यांपैकी किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे, याबद्दल माहिती उपलब्ध नाही.

हेही वाचा: Delhi : 'रॉ'च्या अधिकाऱ्याची 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, कारण...

Amazon ने अलीकडेच हायरिंग फ्रीज जाहीर केले होते. कंपनीने एका इंटरनल मेमोमध्ये म्हटले होते की आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन नोकर भरती थांबवेल. कंपनीतील पीपल एक्सपिरिअन्स अँड टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ उपाध्यक्ष बेथ गॅलेटी यांनी सांगितले होते की हायरिंग फ्रीज काही महिने टिकेल.

टॅग्स :jobAmazonFacebookTwitter