esakal | ऍमेझॉन भारती एअरटेलमध्ये २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

ऍमेझॉन भारती एअरटेलमध्ये २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची शक्यता

अॅमेझॉन आणि भारती एअरटेल यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. अॅमेझॉनसाठी भारत ही महत्त्वाची बाजारपेठ असून कंपनीने भारतात ६.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिलेले आहे.

ऍमेझॉन भारती एअरटेलमध्ये २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची शक्यता

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी, अॅमेझॉन भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेलमध्ये २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. भारती एअरटेलमधील २ अब्ज डॉलर मूल्याचा हिस्सा अॅमेझॉन विकत घेऊ इच्छिते. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे. भारतातील वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून गुंतवणूक करण्याचा अॅमेझॉनचा प्रयत्न आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जर ही बोलणी यशस्वी झाली तर भारती एअरटेलमधील जवळपास ५ टक्के हिस्सा अॅमेझॉन बाजारभावाने विकत घेणार आहे. भारती एअरटेल ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी दूरसंचार कंपनी आहे. एअरटेलचे भारतात ३० कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये जागतिक गुंतवणूकदार मोठी गुंतवणूक करत असताना अॅमेझॉन आणि भारती एअरटेलमधील बोलणी समोर आली आहेत. रिलायन्स जिओ ही एअरटेलची प्रमुख प्रतिस्पर्धी कंपनी आहे.

रिलायन्स जिओने मागील काही आठवड्यात १० अब्ज डॉलरचे भांडवल उभारले आहे. फेसबुक, केकेआर आणि इतर काही आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक केली आहे. अॅमेझॉन आणि एअरटेलमधील बोलणी सध्या प्राथमिक स्तरावर आहेत. यातील अटी, शर्तींमध्ये बदल होऊ शकतात किंवा हा व्यवहार कदाचित पूर्णत्वास जाणारदेखील नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अॅमेझॉन आणि भारती एअरटेल यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. अॅमेझॉनसाठी भारत ही महत्त्वाची बाजारपेठ असून कंपनीने भारतात ६.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिलेले आहे. भारतातील ई-कॉमर्स बाजारपेठेत मोठा विस्तार करण्याची अॅमेझॉनची योजना आहे. अॅमेझॉनने मागील काही वर्षात व्हॉईस अॅक्टिवेटेड स्पीकर्स, व्हिडिओ स्ट्रिमिंग आणि क्लाऊड स्टोरेजच्या माध्यमातून आपली डिजिटल सेवा विस्तारली आहे. भारतातील वाढत्या इंटरनेट आणि स्मार्टफोनधारकांना डोळ्यासमोर ठेवत कंपनी विस्तार करते आहे.

loading image
go to top