ऍमेझॉन भारतात करणार 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक, कोठे?

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जानेवारी 2020

भारतात ई-कॉमर्स व्यवसाय लोकप्रिय होत आहे. त्यादृष्टीने लघु आणि मध्यम उद्योजकांना डिजिटल उपकरणांनी सुसज्ज करण्यासाठी ऍमेझॉन 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

नवी दिल्ली : लघु व मध्यम उद्योगांच्या (एसएमई) डिजिटलायझेशनसाठी ऍमेझॉन 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच भारतीय उत्पादकांना जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली करत पुढील पाच वर्षात 10 अब्ज डॉलरच्या भारतीय वस्तूंची निर्यात करण्याची ग्वाही ऍमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बेझॉस हे भारत दौऱ्यावर आले असून ऍमेझॉनने आयोजित केलेल्या लघु उद्योजकांच्या परिषदेला बुधवारी संबोधित करताना ते बोलत होते.

भारतात ई-कॉमर्स व्यवसाय लोकप्रिय होत आहे. त्यादृष्टीने लघु आणि मध्यम उद्योजकांना डिजिटल उपकरणांनी सुसज्ज करण्यासाठी ऍमेझॉन 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. तसेच अमेझॉनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतीय वस्तुंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देत येत्या पाच वर्षात 10 अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात करण्यासाठी ऍमेझॉन प्रयत्नशील असेल असे त्यांनी म्हटले आहे. दोन दिवसीय दौऱ्यात बेझॉस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहेत. ई कॉमर्स व्यवसायांना जाचक ठरत असलेल्या नियमांना शिथिल करण्याबाबत या भेटीत चर्चा होऊ शकते. अशावेळी बेझॉस यांनी सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या वक्तव्याकडे लक्ष वेधले गेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon will invest 1 billion dollar in small businesses in India says Jeff Bezos