जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आता जेफ बेझोस नव्हे तर...

वृत्तसंस्था
Friday, 25 October 2019

अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोसला यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याच्या किताब गमावला आहे.

नवी दिल्ली: अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोसला यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याच्या किताब गमावला आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील जबरदस्त स्पर्धेचा परिणाम अॅमेझॉनच्या महसूलावर आणि नफ्यावर झाला आहे. आगामी तिमाहीत अॅमेझॉनच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याचा परिणाम होत अॅमेझॉनच्या शेअरच्या किंमतीत 7 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

जेफ बेझोस यांची संपत्ती 103.9 अब्ज डॉलरवर आली आहे. तर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची एकूण संपत्ती 105.7 अब्ज डॉलरवर असल्याची माहिती फोर्बसने दिली आहे. त्यामुळे आता बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 2018 मध्ये जेफ बेझोस यांची संपत्ती तब्बल 160 अब्ज डॉलरवर पोचल्यावर त्यांनी बिल गेट्स यांनी 24 वर्ष राखलेला सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazons Jeff Bezos loses world's richest man title