अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात पाव टक्के वाढ

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

वॉशिंग्टन: अमेरिकी फेडरल रिझर्व्हने काल (बुधवार)  व्याजदर पाव टक्क्याने वाढवण्याची घोषणा केली. व्याजदरात 25 बेसिस पॉईंटची (0.25%) वाढ झाली आहे. आता अमेरिकेतील कर्जाचा दर 2.25 ते 2.50 टक्के झाला आहे. या वृत्तानंतर भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होण्याची शक्यता आहे.

अमेरिकी ‘जॉब मार्केट’मधील परिस्थिती सध्या सुधारणा होत असून रोजगाराच्या संधी वाढत आहेत. वर्षअखेरपर्यंत अर्थव्यवस्थेला आणखी बळ येईल अशी चिन्हे असल्याने व्याजदरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे फेडरल रिझर्व्हकडून सांगण्यात आले.

अमेरिकेचा वृद्धीदर सध्या 3 टक्क्यांवर पोचला आहे. वर्ष 2019 मध्ये अमेरिकी फेडकडून पुन्हा दोनदा दर वाढीची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. आगामी काळात तीनदा दरवाढीची शक्यता होती. आता मात्र त्यात घट करून दोनदा व्याजदरवाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

परकी गुंतवणुकीवर परिणाम होणार?
अमेरिकेची मध्यवर्ती बँक 'फेडरल रिझर्व्ह' कडून व्याजदरात वाढ झाल्यास त्याचा भारतीय भांडवली बाजारावर प्रतिकूल परिणाम होतो. कारण, डॉलर अधिक मजबूत झाल्याने गुंतवणूकदारांचा भारतीय भांडवली बाजारातून गुंतवणूक काढून अमेरिकन बाजारात गुंतवणूक करण्याकडे कल असतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: american federal reserve bank increases 0.25 percent rate of interest