17 हजारांच्या गुंतवणुकीचे झाले 1 कोटी, पण आता शेअर्समध्ये घसरणीचा तज्ज्ञांचा अंदाज... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

17 हजारांच्या गुंतवणुकीचे झाले 1 कोटी, पण आता शेअर्समध्ये घसरणीचा तज्ज्ञांचा अंदाज...

मुंबई : फुटवेअर क्षेत्रातील दिग्गज रिलेक्सो (Relaxo) ही कंपनी गुंतवणुकदारांसाठी मल्टीबॅगर ठरली आहे. पण आता परिस्थिती काहीशी वेगळी आहे. सध्या हे शेअर्स गेल्या एका महिन्यात 6 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. त्यात आणखी घसरण होऊ शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. पण, या शेअरने लाँग टर्ममध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

रिलॅक्सोने फक्त 17,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे. गुरुवारी त्याचे शेअर्स बीएसईवर 1.18 टक्क्यांनी घसरून 924.75 रुपयांवर बंद झाले. त्याची मार्केट कॅप 23,019.44 कोटी रुपये आहे. 14 नोव्हेंबर 2008 रिलॅक्सो फुटवेअरचे शेअर्स 1.49 रुपयांवर होते. सध्या त्याची किंमत 924.75 रुपये आहे, म्हणजे सुमारे 14 वर्षांपूर्वी त्यात गुंतवलेले 17 हजार रुपये आज 1 कोटी झाले असते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये दबाव दिसून येत आहे. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर 2021 रोजी तो 1444 रुपयांवर होता. पण, तेव्हापासून त्यावर दबाव दिसून आला आणि या महिन्याच्या सुरुवातीला 3 नोव्हेंबरला विक्रमी उच्चांकावरून जवळपास 37 टक्के घसरला आणि 908.15 रुपयांच्या एका वर्षाच्या विक्रमी पातळीवर घसरला. पण सध्या शेअर्समध्ये थोडी रिकव्हरी आहे, पण म्हणावी तितकी नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत चलनवाढीची मागणी आणि कंपनीकडून खर्चाच्या दबावामुळे शेअर्सवर परिणाम झाला. चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत, जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये, कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 6 टक्क्यांनी घसरून 670 कोटी रुपयांवर आला आहे. तर व्हॉल्यूमही वर्षभरात 15 टक्क्यांनी घसरला. त्यामुळेच देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी या शेअर्सचा नफा कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. याचे टारगेट 750 रुपयांवरून 700 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketInvestment