आनंद महिंद्रांनी कंपनीसाठी घेतला मोठा निर्णय, कोणता...

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

मुंबई: महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपल्या समूहातील कंपन्यांमध्ये प्लॅस्टिक बाटल्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने या मुद्द्याकडे लक्ष वेधल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी हा निर्णय घेतला आहे. आनंद महिंद्रा सोशल मिडियावर सक्रिय असतात. त्यामुळे ट्विटरवरूनच त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये प्लॅस्टिक बाटल्यांना बंदी घातल्याची माहिती दिली आहे. 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येसुद्धा आनंद महिंद्रा यांनी हवामान बदलाच्यासंदर्भात पावले उचलण्याचा आग्रह धरला होता. एका ट्विटर वापरकर्त्याने आनंद महिंद्रा यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे फोटो टाकून त्या फोटोमधील असंख्य प्लॅस्टिक बाटल्यांकडे निर्देश केला होता. त्या ट्विटची दखल लगेच घेत आनंद महिंद्रा यांनी लगेचच हा निर्णय घेतला आहे. आनंद महिंद्रा ट्विटरवर कमालीचे कृतिशील आहेत. शाश्वत विकासाचाही ते पुरस्कार करत असतात. 

सुमारे 21 अब्ज डॉलर मूल्याच्या महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा अध्यक्ष आहेत. महिंद्रा समूह इलेक्ट्रिक कारचे सुद्धा उत्पादन करते आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आनंद महिंद्रा यांनी जगातील आघाडीचे उद्योगपती आणि व्यावसायिक यांनी एकत्र येऊन हवामान बदलासंदर्भात पावले उचलण्याचे आवाहन केले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anand Mahindra to ban plastic bottles from boardrooms