Anand Mahindra : अदानींच्या वादावर आनंद महिंद्रांचं ट्विट चर्चेत, म्हणाले भारताला कधीही...

अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने देशातील व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे
Anand Mahindra
Anand MahindraSakal

Anand Mahindra : अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने देशातील व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक हेराफेरी आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतला आहे.

यामुळे, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी समूहाचे मार्केट कॅप 100 बिलियन डॉलरपेक्षा जास्त कमी झाले आहेत.

शेअर बाजारातील नुकत्याच झालेल्या घसरणीमुळे भारत आता मार्केट कॅपच्या बाबतीत जगातील पहिल्या पाच देशांमध्येही नाही. आता तो या यादीत सहाव्या स्थानावर घसरला आहे.

अदानी संकटावर भारताच्या आर्थिक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना पद्मविभूषण पुरस्कार विजेते आनंद महिंद्रा यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''व्यवसाय क्षेत्रातील सध्याची आव्हाने जागतिक आर्थिक शक्ती बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला रोखू शकतील का, असा अंदाज जागतिक माध्यमे लावत आहेत.

भूकंप, दुष्काळ, मंदी, युद्धे, दहशतवादी हल्ले यांचा सामना करण्यासाठी मी बराच काळ तगालो आहे. मी एवढेच सांगेन: भारताविरुद्ध कधीही, कधीही पैज लावू नका.''

Anand Mahindra
Adani Group Row : अदानींवर निर्मला सीतारामन यांचं मोठ वक्तव्य म्हणाल्या, कर्ज देणाऱ्या बँकांनी...

अशा प्रकारे महिंद्राने केवळ परदेशातच नाही तर देशातील अशा लोकांना उत्तर दिले आहे जे अदानी संकटाचे निमित्त करून सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ट्विटरवर त्यांचे एक कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

हिंडरबर्ग रिसर्चने अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या 20,000 कोटी रुपयांच्या एफपीओपूर्वी आपला अहवाल प्रसिद्ध केला होता.

मात्र, अदानी समूहाने हा अहवाल खोटारडेपणाचा असून भारताविरुद्धचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ पूर्णपणे सबस्क्राइब झाला असला तरी, अदानी समूहाने नीतिमत्तेचा हवाला देत तो मागे घेण्याचा आणि गुंतवणूकदारांचे सर्व पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

परंतु हिंडरबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये 108 बिलियन डॉलरची घट झाली आहे आणि अदानी देखील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या वरून 21 व्या स्थानावर घसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com