Adani Group Row : हिंडेनबर्ग-अदानी वादात संघाचा पाठिंबा अदानींना; म्हणाले, भारतीयांच्या लॉबीने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Group Row

Adani Group Row : हिंडेनबर्ग-अदानी वादात संघाचा पाठिंबा अदानींना; म्हणाले, भारतीयांच्या लॉबीने...

Adani Group Row : हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांनंतर अदानी समूह मोठ्या संकटात सापडला आहे.

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

अनेक स्तरातून अदानी समूहावर टीका केली जात आहे. या सर्वामध्ये संकटात सापडलेल्या अदानी समूहाच्या बचावासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समोर आला आहे.

संघाचे मुखपत्र ऑर्गनायझरने एका लेखात म्हटले आहे की, शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर भारतीयांच्या एका लॉबीने अदानी समूहाविरोधात नकारात्मकता तयार केल्याचे संघाने म्हटले आहे.

या लॉबीमध्ये डाव्या विचारसरणीशी संबंधित देशातील काही प्रसिद्ध प्रोपगंडा वेबसाइट आणि एका प्रमुख डाव्या विचारसरणीच्या नेत्याच्या पत्रकार पत्नीचा समावेश आहे.

अदानी समूहावरील हा हल्ला हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर प्रत्यक्षात 25 जानेवारीला सुरू झालेला नाही तर, 2016-17 मध्ये ऑस्ट्रेलियापासून सुरू झाला.

एका ऑस्ट्रेलियन एनजीओने गौतम अदानींची बदनामी करण्यासाठी वेबसाइट सुरू केली. बॉब ब्राउन फाउंडेशन (BBF) ही पर्यावरणपूरक स्वयंसेवी संस्था Adaniwatch.org नावाची वेबसाइट चालवते.

ऑस्ट्रेलियातील अदानींच्या कोळसा खाण प्रकल्पाला झालेल्या विरोधापासून याची सुरुवात झाल्याचे संघाने यात म्हटले आहे. त्यानंतर आता या वेबसाईटने पुन्हा अदानींविरेधात बातम्या पसरवणे सुरू केले आहे.

अदानींची ब्रँड इमेज खराब करणे हा या एनजीओचा एकमेव उद्देश असल्याचे संघाने म्हटले आहे. भारतीय एनजीओ नॅशनल फाउंडेशन फॉर इंडियाला (NFI)सोरोस, फोर्ड फाऊंडेशन, रॉकफेलर, ओमिड्यार, बिल गेट्स आणि अझीम प्रेमजी यांच्याकडूनही निधी मिळाला आहे.

अझीम प्रेमजी यांनी एनजीओ IPSMF सुरू केली जी डाव्या विचारसरणीशी संबंधित भारतातील काही प्रसिद्ध प्रोपगंडावेबसाइटला निधी पुरवत असल्याचेही संघाने या लेखात म्हटले आहे.