होंडाकडून नवीन कार सादर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

होंडा कार्स लि.चे अध्यक्ष आणि सीइओ गकु नाकानिशि म्हणाले,होंडा WR-V ही प्रीमियम स्पोर्टी लाईफस्टाइल गाडी ब्रॅण्डचा जागतिक दर्जा वाढवते. भारतामधील सुमारे १ लाख ग्राहकांनी स्वीकारले आहे.

पुणे  : प्रिमिअम कार निर्माता होंडा कार्स लि. ने नवीन होंडा WR-V कारची घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारांमध्ये SV दोन्ही आणि VX दोन्ही फीचर्स आहेत. BS-६ अनुरूप इंजिनमध्ये अत्याधुनिक बाहेरील स्टाइल असलेली ही कार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

होंडा कार्स लि.चे अध्यक्ष आणि सीइओ गकु नाकानिशि म्हणाले, होंडा WR-V  ही प्रीमियम स्पोर्टी लाईफस्टाइल गाडी ब्रॅण्डचा जागतिक दर्जा वाढवते. भारतामधील सुमारे १ लाख ग्राहकांनी  स्वीकारले आहे. आम्ही ग्राहकांच्या मागणीप्रमाणे नवीन गाडी तयार करतो. WR-V नवीन लुकमध्ये असून फीचर्ससुद्धा जास्त आहेत. गाडी ग्राहकांना निश्‍चितच आवडेल, याचा आम्हाला विश्‍वास वाटतो.गाडीत नवीन बोल्डर सीलिंग विंग कोम ग्रील, नवीन अत्याधुनिक एलएडी प्रोजेक्‍टर हेडलॅंप यामध्ये इंटिग्रेटेड DRLs आणि पोझिशन लॅम्प आहेत. ग्राहकांना ३ वर्षाची अमर्याद किलोमीटर वॉरंटी आहे. गाडी प्रिमियम अंबर मेटॅलिक, लूनार सिल्व्हर मेटॅलिक, मॉडर्न स्टील मेटॅलिक रेडिएंट रेड मेटॅलिक आणि प्लॅटिनम व्हाइट पर्ल या सहा रंगामध्ये उपलब्ध आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announced the new Honda WR-V car

Tags
टॉपिकस
Topic Tags: