Anil Ambani : अनिल अंबानींची आणखीन एक कंपनी दिवाळखोरीत; कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Ambani

Anil Ambani : अनिल अंबानींची आणखीन एक कंपनी दिवाळखोरीत; कारण...

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले उद्योगपती अनिल अंबानी हे आर्थिक संकटात आहेत. आता त्यांच्या उद्योग समूहातील आणखी एक कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. अनिल अंबानी समूहाची कर्जबाजारी कंपनी रिलायन्स कॅपिटलचा ई-लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे.

रिलायन्स कॅपिटल लिमिटेड (RCL) ही कंपनी आर्थिक क्षेत्रातील सर्वात मजबूत कंपन्यांपैकी एक होती. आता ती दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत ई-लिलाव होणार आहे. या बोलीची मूळ किंमत 5,300 कोटी रुपये असेल. कॉस्मिया आणि पिरामल यांनी कंपनीसाठी ही बोली लावली आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

रिलायन्स कॅपिटल लिमिटेड या कर्जबाजारी कंपनीचा ई-लिलाव आयोजित करण्यासंबंधीचे नियम आणि प्रक्रिया जवळपास निश्चित झाली आहेत. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, लिलावाच्या पहिल्या फेरीत बोली लावणाऱ्यांना मूळ किमतीपेक्षा जास्त बोली लावावी लागेल.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी कंपनीचा ई-लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. संपूर्ण कंपनी विकत घेण्यासाठी रिलायन्स कॅपिटल लिमिटेडवर ऑक्ट्री, हिंदुजा आणि टोरेंट ग्रुपनेही बोली लावली होती.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ हटवले होते. एलआयसी आणि ईपीएफओच्या विनंतीवरून रिलायन्स कॅपिटलच्या ई-लिलावाचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: नाहीतर खाते बंद करणार.....पीएनबीचा खातेधारकांना इशारा

एलआयसी आणि ईपीएफओ या दोन्ही सरकार-नियंत्रित कंपन्यांची रिलायन्स कॅपिटलमध्ये बरीच भागीदारी आहे. या दोन्ही कंपन्यांची कंपनीच्या कर्जदार समितीमध्ये एकूण 35 टक्के भागीदारी आहे.

रिलायन्स कॅपिटल ही दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत लिलाव होणारी तिसरीनॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे. यापूर्वी श्रेई ग्रुप आणि डीएचएफएलचा लिलाव झाला होता.