ऍपलने 7 हजार कोटींना खरेदी केला इंटेलचा 5जी मॉडेम बिजनेस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

नवी दिल्ली: अमेरिकी कंपनी ऍपलने इंटेलचा 5जी मॉडेम बिझनेस खरेदी कारण्याह निर्णय घेतला आहे. आता सध्या सगळीकडे 5जीचा जमाना आहे. सॅमसंग तसेच हुवाइसारख्या कंपन्या फोल्डेबल आणि 5G स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. यात ऍपल अजूनही मागे आहे. याचाच विचार करत नवीन 5 जी मॉडेमची गरज समजत ऍपलने  इंटेलचा 5जी मॉडेम बिझनेस खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  ऍपल कंपनी आता प्रोसेसर आणि मोबाइल मॉडेम बनविणारा इंटेलचे मॉडेम बिझनेस विकत घेणार आहे. सुमारे 1 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 7 हजार कोटींना हा व्यवहार पूर्ण होणार आहे. 

बऱ्याच दिवसांपासून या निर्णयाची सर्वत्र चर्चा होती. आता मात्र या व्यवहाराअंतर्गत इंटेलचे 2200 कर्मचारी ऍपल कंपनीमध्ये सामील होणार आहेत. शिवाय ऍपलमध्ये 17,000  वायरलेस टेक्नॉलॉजी पेटंट्स असतील जे या क्षेत्रात कंपनीला बळ देतील. 

इंटेलचे सीईओ बॉब स्वान म्हणाले, या व्यवहारानंतर आम्ही 5 जी तंत्रज्ञानावर अधिक चांगला फोकस करू शकू. शिवाय आमच्या टीमकडून तयार करण्यात आलेली मॉडेम बिझनेस आणि क्रिटिकल इंटेलक्चुअल प्रॉपर्टी आमच्याकडेच राहणार असून  ऍपल त्याचा चांगल्याप्रकारे वापर करून घेऊ शकेल. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apple to buy Intel’s smartphone modem business: Its all about 5G