ऍपलची कॉलेज तरुणांसाठी खास ऑफर  

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

नवी दिल्ली: ऍपलने कॉलेज तरुणांसाठी खास ऑफर देत मॅकबुक प्रो आणि एअरच्या किंमती कमी केल्या आहेत. मॅक डिव्हाइसेसना अद्ययावत अर्थात अपडेट करण्यात आले असून किंमत आता 99,900 रुपये करण्यात आली आहे. शिवाय विद्यार्थ्यांना खास सवलत देत 92,704 रुपयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

एंट्री लेव्हलचा 13-इंच मॅकबुक प्रो 8th जनरेशन क्वाड-कोर प्रोसेसर, टच बार आणि टच आयडी, ट्रू टोन रेटिना डिस्प्ले आणि ऍपल टी 2 सिक्युरिटी चिपसह अद्ययावत करण्यात आला आहे. त्याची किंमत 1 लाख 19 हजार 913 रुपये आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठी तो 1 लाख 11 हजार 264 रुपयांना  उपलब्ध करण्यात आला आहे. 

''कॉलेजमधील मुलांना मॅकबुक आवडते. ते त्याचा उपयोग डॉर्म रूम ते क्लासरूमपर्यंत प्रत्येक ठिकाणी करतात, असे मॅक 'प्रॉडक्ट मार्केटिंग'चे वरिष्ठ संचालक टॉम बोगर यांनी सांगितले. 

मॅकबुक एअरमध्ये देखील टच आयडी, 8th जनरेशन ड्युअल-कोर प्रोसेसर, वाइड स्टीरिओ आणि संपूर्ण दिवसभर चालेल अशी दमदार बॅटरी देण्यात आली आहे. शिवाय आधीपेक्षा वजनाने हलका आणि स्लिम करण्यात आला आहे. शिवाय 13-इंच रेटिना डिस्प्लेमध्ये आता 'ट्रू टोन' बसवण्यात आले आहे. जेणेकरून बाहेरील वातावरणानुसार ऑटोमॅटिक रंगाची तीव्रता कमी-जास्त होईल. त्यामुळे डोळ्यांना अधिक अराम मिळेल. 

ऍपल एजुकेशन स्टोअरच्या माध्यमातून  "बॅक टू स्कूल" मोहिमेद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, प्रोफेसर, कॉलेज कर्मचारी 
यांना सवलत देण्यात येणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apple lowers price of MacBook Pro, Air for college students