Apple | कोणत्याही भारतीय कार्डने पेमेंट होणार नाही; Apple चा मोठा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple is asking employees to return to offices
कोणत्याही भारतीय कार्डने पेमेंट होणार नाही; Apple चा मोठा निर्णय

कोणत्याही भारतीय कार्डने पेमेंट होणार नाही; Apple चा मोठा निर्णय

अॅप्पलने आपलं अॅप स्टोअर आणि इतर सबस्क्रिप्शन सेवांसाठी भारतीय डेबिट आणि क्रेडीट कार्ड्सच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारणं थांबवलं आहे. अॅपलने नुकतंच सांगितलं की भारतातून पेमेंट करायचं असेल तर युजर्सना भारतीय डेबिट, क्रेडीट कार्ड वापरता येणार नाही. अॅप स्टोअर किंवा सबस्क्रिप्शन घेण्यासाठी भारतीय युजर्सना इतर पर्याय निवडावे लागतील.

गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय युजर्सना पेमेंट करताना अडचणी येत होत्या. त्यांच्याकडे असलेल्या कार्ड्सचा वापर त्यांना करता येत नव्हता. त्यानंतर अॅपलने आपली भूमिका स्पष्ट केली. भारतीय डेबिड, क्रेडिट कार्ड वापरता येत नसले तरी अॅपल युजर्सना अॅपल आयडी बॅलन्सच्या माध्यमातून या सेवा वापरता येणार आहे. तसंच नेट बँकिंग, युपीआय, अॅप स्टोअर कोड हे पर्यायही सुरू आहेत.

भारतीय रिझर्व बँकेने आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डविषयक धोरणांमध्ये बदल केल्याने अॅपलने हा निर्णय घेतला आहे. सायबर फसवणूक आणि इतर आर्थिक गुन्ह्यांपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशाच प्रकारचे बदल नेटफ्लिक्सनेही केले आहेत.

Web Title: Apple Stops Accepting Payments With Indian Debit Credit Cards

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top