एप्रिलमध्ये 97 हजार कोटींचे महसुली नुकसान

वृत्तसंस्था
Thursday, 14 May 2020

राज्यांना मोठे महसुली नुकसान सोसावे लागले आहे.कोरोना रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीमुळे राज्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून त्यातुलनेत मात्र उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

नवी दिल्ली - देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने देशभरातील उद्योग व्यवसाय बंद आहेत. परिणामी एप्रिल महिन्यात देशाचे 97 हजार 100 कोटी रुपयांच्या महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे बहुतांश व्यवसाय ठप्प असल्याने केंद्र आणि राज्य सरकारला मिळणारा महसूल कमी झाला आहे. याचा सर्वाधिक फटका राज्य सरकारांच्या महसुली उत्पन्नाला बसला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका बसलेले क्षेत्र:
विमान वाहतूक, पर्यटन, हॉटेल्स आणि सेवा क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, लाखो लोकांचे रोजगार या क्षेत्रावर अवलंबून आहेत.

एका अहवालानुसार, लॉकडाऊनमुळे देशातील प्रमुख 21 राज्यांना एप्रिलमध्ये सुमारे 97 हजार 100 कोटींचा महसूल मिळालेला नाही. राज्यांना मोठे महसुली नुकसान सोसावे लागले आहे. कोरोना रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीमुळे राज्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून त्यातुलनेत मात्र उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्योग चक्रात अडथळा
देशव्यापी लॉकडाऊनमुळे व्यवसाय उद्योग ठप्प झाल्यामुळे मागणी आणि पुरवठा साखळीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. बहुतांश परराज्यातील मजूर गावी निघून गेल्यामुळे भविष्यात मनुष्यबळाचा प्रश्न उपस्थित होण्याचा प्रश्न आहे.
शिवाय विमान वाहतूक, पर्यटन, हॉटेल आणि सेवा क्षेत्र अजूनही बंद आहे. येत्या आठवड्यापासून आर्थिक व्यवहार सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र ऑगस्टनंतर अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे.

चीनी कंपनीने बांधला सर्वात मोठा लस उत्पादन प्रकल्प  

राज्यांच्या महसूल घटला: 
महाराष्ट्र-गोवा, गुजरात,  केरळ, तामिळनाडू, तेलंगण,हरयाणा आणि कर्नाटक या राज्यांचा 65 ते 76 टक्के महसूल बुडाला आहे. 

सर्वाधिक फटका बसलेले राज्य आणि महसुली फटका:
गुजरात: 76 टक्के
 तेलंगण: 75.6 टक्के हरयाणा: 74.7 टक्के, कर्नाटक:71.4 टक्के, तामिळनाडू: 70.4 टक्के, महाराष्ट्र: 69.8 टक्के 
केरळ: 69.9 टक्के आणि गोवा: 66.9 टक्के

राज्यांचा एप्रिलमधील बुडालेला महसूल: 
जीएसटीचा एकूण महसूल 26 हजार 962 कोटी, 
मूल्यवर्धित कर (व्हॅट) 17 हजार 895 कोटी,
उत्पानद शुल्क 13,785 कोटी, 
स्टॅम्प आणि मुद्रांक शुल्क: 11 हजार 397 कोटी, 
वाहन कर 6 हजार 055 कोटी, 
वीजेवरील कर 3,464कोटी आणि
 इतर उत्पन्न स्रोत 17,595 कोटी रुपये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In April Government lost revnue of 97000 crores