किरकोळ चलनवाढीत घसरण

पीटीआय
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मार्चमध्ये 4.28 टक्‍के; खाद्यपदार्थ, भाज्यांची महागाई कमी
नवी दिल्ली - किरकोळ चलनवाढीतील घसरण मार्चमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात कायम राहिली आहे. मार्च महिन्यात किरकोळ चलनवाढ ४.२८ टक्‍क्‍यांवर आली असून, खाद्यपदार्थ आणि भाज्यांच्या भावातील घसरण याला कारणीभूत ठरली आहे. 

किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ फेब्रुवारी महिन्यात ४.४४ टक्के होती. रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरांचा आढावा घेताना किरकोळ चलनवाढीचा प्रामुख्याने विचार करण्यात येतो. यावर्षी मार्च महिन्यात किरकोळ चलनवाढ कमी झाली असली तरी मागील वर्षातील मार्च महिन्यापेक्षा ती अधिक आहे. मागील वर्षी मार्चमध्ये किरकोळ चलनवाढ ३.८९ टक्के होती.

केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भाज्यांची महागाई मार्चमध्ये ११.७ टक्के होती. त्याआधीच्या महिन्यात ती १७.५७ टक्के होती. अंडी, दूध आणि प्रथिनांचा जास्त अंश असलेल्या अन्य पदार्थांची भाववाढ मार्चमध्ये कमी आहे. फळांचे भाव मात्र, वाढले आहेत.

किरकोळ चलनवाढ (टक्क्यांमध्ये)
फेब्रुवारी -  ४.४४ 
मार्च - ४.२८
मार्च २०१७ - ३.८९

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arthavishwa news Inflation falling