रिझर्व्ह बॅंकेचे बाँड आता ७.७५ टक्के व्याजदराचे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेच्या ८ टक्के व्याजदराच्या करपात्र सेव्हिंग्ज बाँडमध्ये नवी गुंतवणूक घेणे बंद केले असले, तरी त्याच्याजागी ७.७५ टक्के व्याजदराचे नवे बाँड आणले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने हे स्पष्ट केले.

भारत सरकारचे ८ टक्के व्याजदराचे करपात्र सेव्हिंग्ज बाँड बंद केल्याचे परिपत्रक रिझर्व्ह बॅंकेने काल जारी केल्यानंतर आज शेवटच्या दिवशी अनेक गुंतवणूकदारांनी धावपळ करून या योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेबरोबरच विविध गुंतवणूक सल्लागारांकडे अशा गुंतवणूकदारांची गर्दी दिसून आली.    

दरम्यान, हे बाँड बंद करण्यात येत नसून, आता ७.७५ टक्के दराचे नवे बाँड आणणार आहे. बॅंक ठेवी तसेच अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कपात झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने या बाँडच्या व्याजदरातही पाव टक्का कपात करण्याचे ठरविलेले दिसते. पाव टक्का कपातीनंतरही नवे ७.७५ टक्‍क्‍यांचे बाँडसुद्धा आकर्षक ठरणारे असतील. त्यामुळे भक्कम सुरक्षिततेचा गुंतवणूक पर्याय पुन्हा उपलब्ध होणार असल्याचे आज स्पष्ट झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arthavishwa news reserve bank bond 7.75 percent interest rate