esakal | ‘सकाळ बिमा’सोबत व्यवसायाची सुवर्णसंधी
sakal

बोलून बातमी शोधा

sakalbima

देशातील सर्व (लाइफ,हेल्थ आणि जनरल)विमा कंपन्यांसोबत व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी आता चालून आली आहे. या व्यावसायिक उपक्रमात ‘पॉइंट ऑफ सेल्स पर्सन’ (पीओएसपी)म्हणून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

‘सकाळ बिमा’सोबत व्यवसायाची सुवर्णसंधी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोना विषाणूच्या साथीमुळे सर्व प्रकारच्या विम्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. संकटकाळी विम्याचे कवच असणे गरजेचे बनले आहे. हीच बाब लक्षात घेऊन समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत विम्याविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना विम्याचे पुरेसे सुरक्षा कवच मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘सकाळ बिमा’ने पुढाकार घेतला आहे. 

विमा सेवा क्षेत्रातील आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तारणाऱ्या ‘सकाळ बिमा’सोबत काम करण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशातील सर्व (लाइफ, हेल्थ आणि जनरल) विमा कंपन्यांसोबत व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी आता चालून आली आहे. या व्यावसायिक उपक्रमात ‘पॉइंट ऑफ सेल्स पर्सन’ (पीओएसपी) म्हणून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सकाळ बिमा’ हा आघाडीचा ब्रँड असून, आम्ही देशातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सर्व विमा कंपन्यांशी भागीदारी केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार, विमा व गुंतवणूक प्रतिनिधी; तसेच इतर इच्छुकांना या व्यावसायिक उपक्रमात ‘पॉइंट ऑफ सेल्स पर्सन’ (पीओएसपी) म्हणून सहभागी होता येणार आहे. आमचे व्यावसायिक भागीदार झाल्यामुळे पुढील विशेष लाभ मिळू शकतील...

कागदपत्रांविना डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा घेत विमा काढण्यासाठी सुसज्ज असे मोबाईल अॅप्लिकेशन.

विक्री आणि विपणनाच्या (मार्केटिंग)संदर्भात ‘सकाळ बिमा’कडून पूर्ण सहकार्य.

कमिशनच्या रूपाने नियमित उत्पन्न.

तुमच्या कामाचे तुम्हीच ‘बॉस’!

आयुष्य-भराच्या उत्पन्नाची तजवीज.

नियमित कमिशन-व्यतिरिक्त, आकर्षक बक्षिसे आणि परदेशवारीची संधी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीओएसपी फ्रेंडली ‘बी टू बी’ मॉडेल
सुरुवातीच्या टप्प्यात ‘सकाळ बिमा’ने पीओएसपी फ्रेंडली ‘बी टू बी’ मॉडेल अवलंबिले असून, त्यानुसार आपली वेबसाइट डिझाइन केली आहे. त्याअंतर्गत पीओएसपींना विशेष लॉगइन आयडी देऊन विविध कंपन्यांचे प्रीमियम आणि फीचर्सची तुलना करता येईल आणि ग्राहकांची गरज लक्षात घेऊन योग्य विमा योजना सुचविणे सहजशक्य होईल. ही माहिती व्हॉट्सअॅप किंवा ई-मेलच्या माध्यमातून ग्राहकाला सहजपणे पाठविता देखील येईल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा