esakal | गुंतवणुकीचा सोपा फंडा : ईटीएफ 
sakal

बोलून बातमी शोधा

ETF

अमेरिकेच्या प्रमाणात नाही;पण भारतातही गुंतवणूकदार हे "ईटीएफ'कडे वळत आहेत. त्याला कारण आहे कमी खर्च,विविध निर्देशांक आणि तरलता! आज आपण"ईटीएफ'चा वापर पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी कसा करावा ते पाहणार आहोत

गुंतवणुकीचा सोपा फंडा : ईटीएफ 

sakal_logo
By
लक्ष्मीकांत श्रोत्री

मागच्या दहा वर्षांत म्हणजे 2008 च्या पडझडीनंतर अमेरिकेत एक्‍स्चेंज ट्रेडेड फंडातील (ईटीएफ) गुंतवणूक ही 530 अब्ज डॉलरवरून 4000 अब्ज डॉलरवर पोचली आहे. अगदी अमेरिकेच्या प्रमाणात नाही; पण भारतातही गुंतवणूकदार हे "ईटीएफ'कडे वळत आहेत. त्याला कारण आहे कमी खर्च, विविध निर्देशांक आणि तरलता! 

आज आपण "ईटीएफ'चा वापर पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी कसा करावा ते पाहणार आहोत. 

"ईटीएफ'ची वैशिष्टे 
- हा एक म्युच्युअल फंडासारखा प्रकार आहे. 
- हा काही ठराविक समभागांचा संच असतो. 
- हे इक्विटी, डेट/बॉंड आणि गोल्डमध्ये उपलब्ध आहेत. 
- यातील युनिट्‌सची स्टॉक एक्‍स्चेंजमध्ये खरेदी-विक्री करता येते. 
- याची "एनएव्ही' बाजारातील चढ-उतारानुसार बदलते. 
- "टीईआर' हा बाकी म्युच्युअल फंडांपेक्षा खूप कमी असतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मालमत्ता विभागणी 
- मालमत्ता विभागणी सहज करता येते. 
- मालमत्ता विभागणीसाठी इक्विटी ईटीएफ, डेट/बॉंड ईटीएफ आणि गोल्ड ईटीएफ योग्य पर्याय आहेत. 
उदाहरणार्थ, 50 टक्के इक्विटी ईटीएफ, 35 टक्के डेट/बॉंड ईटीएफ आणि 15 गोल्ड ईटीएफ. 

विविधीकरण 
- विविधीकरण करणे सहज आणि सोपे आहे. 
- भारतात आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक शक्‍य आहे. 
- निफ्टी, सेन्सेक्‍स, निफ्टी ज्युनिअर; तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी नास्डॅक, ह्यांगसेंग या निर्देशांकाचे ईटीएफ उपलब्ध आहेत. 

खरेदी-विक्री व्यवहार 
- शेअर बाजारात इतर शेअरप्रमाणे खरेदी-विक्री करता येते. 
- "एसआयपी' करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही प्रचलित ईटीएफ 
ईटीएफ प्रकार 

निप्पॉन इंडिया निफ्टी बीज इक्विटी - निफ्टी 50 
निप्पॉन इंडिया निफ्टी ज्युनिअर बीज इक्विटी - निफ्टी नेक्‍स्ट 50 
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल सेन्सेक्‍स ईटीएफ इक्विटी - बीएसई सेन्सेक्‍स 
निप्पॉन इंडिया ईटीएफ गोल्ड बीज - गोल्ड 
निप्पॉन इंडिया ईटीएफ लिक्विड बीज - डेट 
एड्‌लवाईज भारत बॉंड ईटीएफ (एप्रिल 2023) - डेट 

(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर - सीएफपी आहेत.)