इक्विटी म्युच्युअल फंडासाठी ‘कट ऑफ’ पुन्हा ३ वाजताच

सुवर्णा येनपुरे-कामठे
Monday, 19 October 2020

तुमच्या इक्विटी म्युच्युअल फंडाची रक्कम तुमच्या खात्यातून वजा होणार असल्यास, खात्यात दुपारी ३ वाजेपर्यंत रक्कम जमा करावी. तसेच, काढण्यासाठीही ३ वाजेपर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. 

‘सेबी’ने इक्विटी म्युच्युअल फंडाची ‘कट ऑफ’ची वेळ पुन्हा ३ वाजेपर्यंतची केली आहे. ही सुधारित वेळ १९ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. याचाच अर्थ, सोमवारपासून तुमच्या इक्विटी म्युच्युअल फंडाची रक्कम तुमच्या खात्यातून वजा होणार असल्यास, खात्यात दुपारी ३ वाजेपर्यंत रक्कम जमा करावी. तसेच, काढण्यासाठीही ३ वाजेपर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इक्विटी योजनेसाठी त्या दिवसाचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) मिळविण्यासाठी अर्ज आणि रक्कम वेळेत म्हणजेच दुपारी ३ वाजेपर्यंत जमा होणे महत्त्वाचे असणार आहे. इक्विटी योजनांसाठी तुम्ही धनादेशाच्या स्वरूपात दुपारी ३ वाजण्यापूर्वी रक्कम दिली, तरीही ती रक्कम म्युच्युअल फंडाच्या खात्यात ज्या दिवशी जमा होईल, त्या दिवसाची ‘एनएव्ही’ तुम्हाला मिळेल. मात्र, ऑनलाइन खात्यातून तुम्ही ज्या दिवशी दुपारी ३ वाजण्यापूर्वी रक्कम ट्रान्स्फर कराल, त्याच दिवसाची ‘एनएव्ही’ तुम्हाला मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डेट, लिक्विड आणि ओव्हरनाइट योजनांसाठी आधीचेच नियम लागू राहतील. डेट योजनांसाठी दुपारी एक वाजेपर्यंतचे ‘कट ऑफ’ आहे. लिक्विड आणि ओव्हरनाइट योजनेसाठी पैसे जमा करण्यासाठी १२.३० आणि काढण्यासाठी १ वाजेपर्यंतचा वेळ राहील. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इतर सर्व योजनांसाठी पूर्वीप्रमाणेच नियम राहतील.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about equity mutual funds

Tags
टॉपिकस
Topic Tags: