शेअरमध्ये गुंतवणूक कशी कराल?

गोपाळ गलगली
Monday, 22 February 2021

शेअर बाजार तेजीत असला, की प्रत्येकाला उत्साह येतो आणि सर्वच शेअर वाढत असल्यामुळे गुंतवणुकीच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. फार जोखीम नको म्हणून लोकप्रिय कंपन्यांचे शेअर चढ्या भावाने घेतले जातात.

शेअर बाजार तेजीत असला, की प्रत्येकाला उत्साह येतो आणि सर्वच शेअर वाढत असल्यामुळे गुंतवणुकीच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. फार जोखीम नको म्हणून लोकप्रिय कंपन्यांचे शेअर चढ्या भावाने घेतले जातात. परंतु, आताच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी चांगल्या; परंतु वेगाने वाढणाऱ्या शेअरचे तीन विभाग केले पाहिजेत :

कमी भावाचे, पण भरपूर वाढणारे : रु. ५०० च्या आतील. (उदा. स्टेट बँक, अशोक लेलँड, विप्रो, टाटा मोटर्स, डीएलएफ)

मध्यम भावाचे, पण भरपूर वाढणारे : रु. ५०१ ते १५०० (उदा. आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, टाटा कन्झुमर, एचसीएल)

चढ्या भावाचे, पण भरपूर वाढणारे : रु. १५०१ च्या वरील (उदा. टीसीएस, एचडीएफसी, पिडीलाईट, एशियन पेंट्स, अपोलो हॉस्पिटल, बजाज फायनान्स)

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

समजा एखाद्या अभ्यासू गुंतवणूकदाराला रु. १०,००० गुंतवायचे असतील तर त्याने ते कसे गुंतविले, तर त्याला जास्त परतावा मिळू शकेल?

यासाठी एक छोटा अभ्यास करूया.
वर दिलेल्या कमी भावाच्या, मध्यम भावाच्या आणि चढ्या भावाच्या; पण भरपूर वाढणाऱ्या शेअरच्या सहा महिन्यांपूर्वीच्या भावाची आणि आताच्या भावाच्या बेरजेची तुलना केली, तर असे आढळून येते :

विभाग सहा महिन्यांतील वाढ
१) कमी भाव, भरपूर वाढ    ८५%
२) मध्यम भाव, भरपूर वाढ    ५४%
३) चढा भाव, भरपूर वाढ    ४८%

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावरून असे दिसून येते, की या तेजीच्या काळात गुंतवणूकदारांनी कमी भावाच्या; पण भरपूर वाढणाऱ्या नावाजलेल्या कंपन्यांच्या शेअरमधे गुंतवणूक केली पाहिजे. यात दुसरा फायदा म्हणजे आपली गुंतवणुकीची रक्कम कमी राहते आणि परतावा मात्र जास्त मिळण्याची शक्यता असते.
(लेखक शेअर बाजाराचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about invest in stocks