
सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची या वर्षातील शेवटची संधी आली आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील सार्वभौम सुवर्णरोख्यांची नववी मालिका जाहीर केली आहे.
सार्वभौम सुवर्णरोख्यांची अर्थात सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची या वर्षातील शेवटची संधी आली आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील सार्वभौम सुवर्णरोख्यांची नववी मालिका जाहीर केली आहे. २८ डिसेंबरपासून या योजनेत गुंतवणूक करता येईल. मुख्य म्हणजे बाजारभावापेक्षा कमी किमतीत हे रोखे मिळणार आहेत.
अपुऱ्या बँलेन्समुळे होते ATM ट्रान्झेक्शन फेल; यावर आकारला जातो इतका दंड
नवी मालिका सुरू होण्याची तारीख - २८ डिसेंबर २०२०
अंतिम तारीख - १ जानेवारी २०२१
प्रति ग्रॅम किंमत - ५००० रुपये
किमान गुंतवणूक - एक ग्रॅम (५ हजार रुपये)
कमाल गुंतवणूक - चार किलो (२ कोटी रुपये)
डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी किंमत - ४९५० रुपये
सुवर्णरोख्यांचा कालावधी - ८ वर्षे
इश्यू किमतीवर व्याज - २.५० टक्के वार्षिक
आणखी बातम्या व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि निवडक टपाल कार्यालयांतून हे रोखे विक्रीसाठी उपलब्ध असतील. तसेच, स्मॉल फायनान्स बँका व पेमेंट बँका वगळता अन्य सर्व बँकांतून आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) येथूनही सुवर्णरोख्यांची खरेदी करता येते.