esakal | अपुऱ्या बँलेन्समुळे होते ATM ट्रान्झेक्शन फेल; यावर आकारला जातो इतका दंड
sakal

बोलून बातमी शोधा

atm

फेल झालेल्या ट्रान्झेक्शन्सवर वेगवेगळ्या बँका कशाप्रकारे फि आकारतात, हेही जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

अपुऱ्या बँलेन्समुळे होते ATM ट्रान्झेक्शन फेल; यावर आकारला जातो इतका दंड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : आपल्या बँकेच्या सेव्हींग खात्यामध्ये नेहमीच पुरेसा बँलन्स ठेवणं, ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. मिस्ड कॉल आणि एसएमएस द्वारे बँलन्स जाणून घ्यायची सुविधा असतानाही बरेचदा आपलं याकडे दुर्लक्ष होतं. कमी बँलन्स असलेलं माहित नसताना ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास असे ट्रान्झेक्शन्स फेल होतात. त्यामुळे फेल झालेल्या ट्रान्झेक्शन्सवर अधिक फि भरावी लागते. त्यामुळे, पैसे काढण्याआधीच आपला बँक बँलन्स जाणून घेणे, केंव्हाही फायद्याचेच ठरते. तसेच, असे फेल झालेल्या ट्रान्झेक्शन्सवर वेगवेगळ्या बँका कशाप्रकारे फि आकारतात, हेही जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक तसेच इतर काही बँका या फेल झालेल्या ATM ट्रान्झेक्शनवर फि आकारतात.

- State Bank of India (SBI)

अपुऱ्या बँलेन्समुळे ट्रान्झेक्शन फेल झाले तर SBI 20 रुपये अधिक GST इतकी फि आकारते. 

- HDFC Bank

इतर बँकांच्या ATM मधून पैसे काढताना जर ट्रान्झेक्शन फेल झालं तर 25 रुपये अधिक असेल तो कर भरावा लागतो. 

- ICICI Bank

इतर बँकेच्या ATM मधून ट्रान्झेक्शन करताना जर अपुऱ्या बँलेन्समुळे ते फेल झाले तर प्रत्येक ट्रान्झेक्शनमागे 25 रुपयांचा दंड बसतो.

- Kotak Mahindra Bank

फेल झालेल्या ATM ट्रान्झेक्शनवर 25 रुपयांचा दंड बसतो.

- YES Bank

अपुऱ्या बँलेन्सवरील ट्रान्झेक्शनवर 25 रुपयांचा दंड बसतो.

- Axis Bank

इतर बँकाच्या ATM मधून पैसे काढताना ट्रान्झक्शेन फेल झाल्यास एक्सिस बँकसुद्धा 25 रुपयांचा दंड आकारते. 

त्यामुळे, इथून पुढे जेंव्हा केंव्हा तुम्ही ATM मधून पैसे काढायला जाता तेंव्हा तुमच्या खात्यात मिनीमम बँलेन्स आहे की नाही याची खात्री करुनच जा. अन्यथा विनाकारण तुम्हाला भुर्दंड सोसावा लागू शकतो. 

loading image