यहाँ कल क्‍या हो, किसने जाना !

भूषण गोडबोले
Monday, 23 March 2020

‘कोरोना’सारख्या जागतिक संकटामुळे जगभरातील शेअर बाजारांबरोबर भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली. दीर्घकाळात शेअर बाजारात उत्तम परतावा मिळतो म्हणून ज्या गुंतवणूकदारांनी दहा वर्षांपूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. तसेच, शेअर बाजाराचा चढता आलेख पाहून पाच वर्षांपूर्वी ज्यांनी शेअर बाजारात उत्साहाने पैसे गुंतविले होते आज ते हताश आहेत. ‘कोरोना’च्या अवचित हल्ल्याने बाजारात मोठी पडझड झाली. मात्र, आता गुंतवणूकदाराला या संकटावर मात करावयाची आहे तसेच आता गुंतवणूक कुठे आणि कशी करावी? असा मोठा प्रश्न पडला आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेअर बाजारात आता काय होणार किंवा नक्की बाजार कुठे जाणार याबद्दल कोणीच सांगू शकत नाही. शेअर बाजारात उत्तम परतावा मिळण्यासाठी बाजाराचे मूल्याकंन (व्हॅल्युएशन) बघणे आवश्‍यक असते. मात्र, सामान्य गुंतवणूकदारास प्रत्येक वेळेस बाजाराचे मूल्याकंन पाहून गुंतवणूक करणे शक्‍य होत नाही. सामान्य गुंतवणूकदाराने सर्व रक्कम केवळ शेअर बाजारात गुंतविण्याऐवजी बाजाराबरोबरच सोने तसेच रोखे बाजारात विभागणी (डायव्हर्सिफाइड) करून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी केलेल्या गुंतवणुकीचा आढावा घेऊन जिथे वाढ झाली तिथून नफा काढला पाहिजे. तो नफा दुसऱ्या गुंतवणुकीच्या साधनांमध्ये गुंतविला पाहिजे.

उदाहरणार्थ वर्षाच्या शेवटी सोन्याच्या भावात वाढ झाली असेल आणि शेअर बाजारात घसरण झाली असेल तर सोन्यामधील झालेला नफा शेअर बाजारात गुंतविल्यास संपूर्ण गुंतवणुकीवर समतोल साधता येतो. म्हणजे शेअर बाजार जसजसा वधारले तशी आपली गुंतवणूकदेखील वाढेल. म्हणजेच सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूक वेगवेगळ्या ॲसेट क्‍लासमध्ये वळविणे गरजेचे आहे. जेणेकरून विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करून वर्षाअखेर नफा घेऊन समतोल साधल्याने एकाच ठिकाणी गुंतवणूक करून निर्माण होणारा धोका तसेच अस्थिरता कमी करता येणे शक्‍य होईल. कधी शेअर बाजारात तेजी येते तर कधी सोन्याचे भाव वधारतात. लोभापोटी गुंतवणूक एकाच ठिकाणी करून धोका पत्करण्यापेक्षा गुंतवणूक करताना ‘डायव्हर्सिफिकेशन’ करणे योग्य ठरेल. कारण, ‘यहाँ कल क्‍या हो किसने जाना?’
लेखक : सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article bhushan godbole on share market