तुम्ही घरखर्चाचे व्यवस्थापन केल्यास तुमचे भविष्य सुरक्षित होईल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

अनेक लोकांचा समज असतो, की तो खर्च होणारच आहे. त्यात काय व्यवस्थापन करायचे?आपण आज एक फॉर्मुला पाहणार आहोत. ५०-३०-२० या फॉर्मुल्याने तुम्ही घरखर्चाचे व्यवस्थापन केल्यास तुमचे भविष्य सुरक्षित होईल. 

घरखर्च सगळ्यात महत्त्वाचा आणि नीट व्यवस्थापन न केलेला विषय. अनेक लोकांचा समज असतो, की तो खर्च होणारच आहे. त्यात काय व्यवस्थापन करायचे? आपण आज एक फॉर्मुला पाहणार आहोत. ५०-३०-२० या फॉर्मुल्याने तुम्ही घरखर्चाचे व्यवस्थापन केल्यास तुमचे भविष्य सुरक्षित होईल. अनेकांचे म्हणणे असते की कमावलेला पैसा कसाबसा पुरतो, तर बाकी गोष्टींकडे कसे पाहणार. ५० टक्के गरज, ३० टक्के बचत आणि २० टक्के इच्छा यांप्रमाणे तुमच्या महिन्याच्या कमाईचा विनियोग करावा. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गरज किंवा अत्यावश्‍यकमध्ये काय येते? (५० टक्के) 
- घराचा हप्ता किंवा घरभाडे 
- किराणा, दूध, भाजी इत्यादी 
- वीज बिल, वाहनासाठी पेट्रोल आदी. 
- औषधे, डॉक्टर आदी. 
- विमा हप्ता 

बचत आणि गुंतवणूक ३० टक्के 
- निवृत्तीसाठी गुंतवणूक 
- मुलांच्या भविष्यासाठी, शिक्षण, लग्नासाठी गुंतवणूक 
- आपत्कालीन फंड 
- भविष्यातील मोठ्या खर्चांसाठी तरतूद 

इच्छेखातर (२० टक्के) 
- करमणुकीसाठी होणारा (सिनेमा, नाटक, लाँग ड्राईव्ह आदी) 
- वैयक्तिक देखभाल. 
- छंद किंवा आवड 
- क्लब, मासिके, टीव्ही चॅनेल, वीकएण्ड पर्यटन आदी 

आवश्यक खर्चात तुम्हाला खर्च कमी करण्याचा पर्याय शून्य आहे. ‘इच्छेखातर’च्या बाबतीत आपण हे जास्त प्रमाणात करू शकतो. आपण आवश्‍यक आणि इच्छा याचे व्यवस्थित नियोजन करू शकल्यास बचत आणि गुंतवणूक व्यवस्थित करू शकू. तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या उत्तम भविष्यासाठी व्यवस्था करायची असल्यास गरज आणि इच्छा यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भविष्यासाठी १० रुपयाची बचत करणे आवश्यक असेल आणि तेवढे तुमचे पैसे उरत नसल्यास ५ ते ६ रुपयांची सोय ही तुमच्या गरज आणि इच्छामधून करा. तुमचे उत्पन्न ४ ते ५ रुपयांनी वाढवण्याचे प्रयत्न करा. एकदम १० रुपयांनी उत्पन्न वाढवणे सोपे नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on you manage your household expenses

Tags
टॉपिकस
Topic Tags: