अरुण जेटली पुन्हा अर्थमंत्रालयात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - मूत्रपिंडाच्या त्रासामुळे गेले तीन महिने कामकाजापासून लांब असलेल्या अरुण जेटली यांनी आज पुन्हा केंद्रीय अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. मूत्रपिंडाच्या त्रासामुळे जेटली मे महिन्यात या पदावरून पायउतार झाले होते. त्यानंतर या पदाचा कार्यभार रेल्वे व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आला होता. जेटली यांच्यावर १४ मे रोजी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्‍टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. आता त्यांची प्रकृती ठीक असून, त्यांच्याकडे अर्थ व कंपनी व्यवहार खात्याचा कार्यभार सोपवावा, असे आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिले.

नवी दिल्ली - मूत्रपिंडाच्या त्रासामुळे गेले तीन महिने कामकाजापासून लांब असलेल्या अरुण जेटली यांनी आज पुन्हा केंद्रीय अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. मूत्रपिंडाच्या त्रासामुळे जेटली मे महिन्यात या पदावरून पायउतार झाले होते. त्यानंतर या पदाचा कार्यभार रेल्वे व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आला होता. जेटली यांच्यावर १४ मे रोजी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्‍टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. आता त्यांची प्रकृती ठीक असून, त्यांच्याकडे अर्थ व कंपनी व्यवहार खात्याचा कार्यभार सोपवावा, असे आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिले. दरम्यान, अर्थमंत्रीपदाची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतल्यानंतर जेटली यांनी लागलीच अर्थ विभागाचे सचिव हसमुख अधिया व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Jaitley in Finance minister