अरुण जेटलींचे 'मेडिकल चेकअप'साठी अमेरिकेला प्रयाण

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जानेवारी 2019

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अचानक वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. जेटली किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. 14 मे 2018 ला त्यांनी किडनी ट्रान्सप्लान्टचे शस्त्रक्रियासुद्धा केली आहे. त्यानंतर नऊ महिन्यात जेटली एकदाही परदेशात गेले नव्हते. मागील वर्षी एप्रिल महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील 10व्या आर्थिक परिषदेत लंडन येथे जेटलींनी हजर राहणे अपेक्षित होते. मात्र किडनीच्या आजारपणामुळे जेटली त्या परिषदेला हजर राहिले नव्हते. रविवारी रात्री अरुण जेटली वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. 

येत्या 1 फेब्रुवारीला जेटलींना स्वत:चा सहावा आणि भाजप-एनडीए सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करावयाचा आहे. हा जरी अंतरिम अर्थसंकल्प असला तरी अरुण जेटलींचे पूर्ण लांबीचे भाषण यावेळी अपेक्षित आहे. मागील वर्षी जेटलींना एप्रिल महिन्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. जेटलींच्या अनुपस्थितीत पियुष गोयल यांनी अर्थ मंत्रलयाची धूरा वाहिली होती. जेटलींचे वय 66 वर्षांचे असून 23 ऑगस्टपासून त्यांनी नॉर्थ ब्लॉकमधील आपल्या कार्यालयात कामकाज सुरू केले होते. जेटलींना डायबेटीसचासुद्धा आजार आहे. यासंदर्भातही त्यांची शस्त्रक्रिया झालेली आहे. तर सात वर्षांआधी ते ह्रदयविकाराच्या शस्त्रक्रियेलाही सामोरे गेलेले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Jaitley Flies To US For Medical Check