अस्थिरतेतही आकर्षण अल्पबचत योजनांचे 

अरविंद परांजपे 
Monday, 6 July 2020

पहिल्या तिमाहीत सरकारने व्याजदरात मोठी कपात केली होती. त्यावेळी या योजनांच्या व्याजदरात 0.70 टक्के ते 1.40 टक्के इतकी मोठी कपात केल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठी झळ बसलेली होती.

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जुलै ते सप्टेंबर 2020) अल्पबचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत. पहिल्या तिमाहीत सरकारने व्याजदरात मोठी कपात केली होती. त्यावेळी या योजनांच्या व्याजदरात 0.70 टक्के ते 1.40 टक्के इतकी मोठी कपात केल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठी झळ बसलेली होती. यावेळी आणखी कपात न केल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. 

अल्पबचत योजना कोणत्या?   
- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मासिक प्राप्ती योजना (एमआयएस), मुदत ठेव (टीडी), आवर्ती ठेव (आरडी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय). 
- या योजना प्रामुख्याने पोस्टाच्या, तसेच निवडक बॅंकांच्या माध्यमातून राबविल्या जातात. 
- थेट सरकारी योजना असल्याने सर्वोच्च सुरक्षितता आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय. 

नव्या तिमाहीसाठीचे व्याजदर 
- पीपीएफ ः 7.1 टक्के 
- एनएससी ः 6.8 टक्के 
- केव्हीपी ः 6.9 टक्के 
- एमआयएस ः 6.6 टक्के 
- 1 ते 3 वर्षीय टीडी ः 5.5 टक्के 
- 5 वर्षीय टीडी ः 6.7 टक्के 
- आरडी ः 5.8 टक्के 
- एससीएसएस ः 7.4 टक्के 
- एसएसवाय ः 7.6 टक्के 

कमी व्याजदर कशामुळे? 
- रिझर्व्ह बॅंकेकडून अलीकडच्या काळात "रेपो रेट'मध्ये सातत्याने मोठी कपात. 
- बॅंकांतील "एफडीं'चे दर कमी केले जाऊ लागले. 
- अल्पबचत योजनांचे व्याजदर बाजारातील प्रचलित व्याजदरांशी सुसंगत ठेवण्याचे धोरण 
- दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन व्याजदराची निश्‍चिती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind paranjpe article about Small savings plan