सकाळ एक्‍सक्‍ल्युझिव्ह: "बाजारातील चढ-उतारांमुळे घाबरायची गरज नाही'

सोमवार, 15 एप्रिल 2019

शेअर बाजारात सरलेल्या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार झाले. पण बाजारातील अशा चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांनी घाबरायची गरज नाही. म्युच्युअल फंडाच्या दृष्टीने बाजारातील चढ-उतार हे महत्त्वाचेच असतात.

घसरत्या बाजारात नव्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी मिळते. ज्यांनी आधीपासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली आहे, त्यांनी अशा वेळी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अधिक वाढविली पाहिजे. शिवाय बॅंकांचे व्याजदर दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे इक्विटीबरोबरच डेट फंडातील गुंतवणूकदेखील कायम ठेवणे आवश्‍यक आहे; जेणेकरून व्याजदर कमी झाले तरी त्याचा फायदा मिळू शकेल. 
 
आशुतोष बिश्नोई यांच्याशी गौरव मुठे यांनी साधलेला संवाद पाहण्यासाठी हा क्‍यूआर कोड स्कॅन करा. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashutosh Bishnoi exclusive interview with Sakal