विमानाचे इंधन झाले पेट्रोल, डिझेलहूनही स्वस्त!

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

नवी दिल्ली: हवाई वाहतूक इंधनात किंवा जेट इंधनाच्या दरात 14.7 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने जेट इंधनाचे दरसुद्धा खाली आले आहेत. त्यामुळे जेट इंधन आता पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही स्वस्त झाले आहे. विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जेट इंधनाच्या दरांमध्ये 9,990 रुपये प्रति किलोलीटरची म्हणजेच 14.7 टक्क्यांची घट होत ते आता 58,060.97 रुपये प्रति किलोलीटरवर पोचले आहेत. 

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा जेट इंधनात कपात झाली आहे. त्याचबरोबर आतापर्यतची ही सर्वात मोठी कपात आहे. याआधी 1 डिसेंबरला जेट इंधनाच्या दरात 8,327.83 रुपये प्रति किलोलीटरची म्हणजेच 10.9 टक्क्यांची घट झाली होती. दोन सलग दरकपातींमुळे हवाई वाहतूक इंधन किंवा जेट इंधन पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही स्वस्त झाले आहे. मोटरसायकल किंवा चारचाकी वाहनांसाठी वापरण्यात येणारे पेट्रोल दिल्लीत 68.65 रुपये प्रति लिटर आहे तर जेट इंधन 58.06 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर बस आणि ट्रकसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत 62.66 रुपये प्रति लिटर आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला डेट इंधनाच्या दरामध्ये बदल केले जातात. त्याउलट पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज बदलत असतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATF price cut by 14.7pct; costs less than petrol, diesel