esakal | ATM मशीन एक, फायदे अनेक; पैसे काढण्याशिवाय होतात ही 5 कामे
sakal

बोलून बातमी शोधा

ATM

ATM चा वापर फक्त पैसे काढण्यासाठी केला जातो हा सर्वसाधारण समज आहे. पण ATM चा वापर हा फक्त पैसे काढण्याशिवाय आणखीही कामांसाठी करता येतो.

ATM मशीन एक, फायदे अनेक; पैसे काढण्याशिवाय होतात ही 5 कामे

sakal_logo
By
सुमित बागुल

ATM चा वापर फक्त पैसे काढण्यासाठी केला जातो हा सर्वसाधारण समज आहे. पण ATM चा वापर हा फक्त पैसे काढण्याशिवाय आणखीही कामांसाठी करता येतो. सध्याच्या काळात ATM चा वापर कॅश जमा करण्यासाठी, मोबाइल रिचार्ज करण्यासाठी, यूटिलिटी बिल भरण्यासाठी आणि लोन घेण्यासाठी करता येतो. आश्चर्य वाटले ना, पण हे खरं आहे. SBI सोबत अनेक बँका आपल्या ग्राहकांना ATM च्या माध्यमातून अनेक सुविधा देत आहेत. या 5 सेवांबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

कॅश डिपॉझिट
SBI सोबत अनेक बँकेच्या ATM मध्ये कॅश डिपॉझिटची सुविधा आहे. तुम्ही पैसे काढण्याशिवाय कॅश जमा करू शकता. यासाठी तुम्हाला ATM मशीनमध्ये पैसे टाकून योग्य ते पर्याय निवडायचे आहेत आणि तुमचे पैसे सहजरीत्या अकाउंटला जमा होतील. किंवा चेकही तुम्ही ATM मशीन मध्ये डिपॉझिट करू शकता.

फंड ट्रान्सफर
ATM च्या माध्यमातून तुम्ही फंड ट्रान्सफरही करू शकता. SBI ATM मध्ये एका SBI डेबिट कार्ड मधून दुसऱ्या SBI डेबिट कार्डमध्ये 40,000 रुपये एका दिवसात कार्ड टू कार्ड ट्रान्सफर करता येऊ शकतात.

हेही वाचा: ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टेक लीडर होण्यास MG Motors India सज्ज; Jio सोबत करार

यूटिलिटी बिलाचे पेमेंट
ATM मध्ये जाऊन वीज बिल, पाणी बिलांसारखे यूटिलिटी बिल्सचे पेमेंटही तुम्ही करू शकता. SBI सोबत अनेक बँकांच्या ATM मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. ATM मधून क्रेडिट कार्डचे बिलही भरता येऊ शकते. यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड नंबर माहित असणे आवश्यक आहे.

मोबाइल रिचार्ज
जर तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे इंटरनेट नाहीये आणि तुम्हाला मोबाईल रिचार्ज करायचे आहे तर तुम्ही ATM मध्ये जाऊन मोबाइल रिचार्ज करू शकता. SBI सोबत अनेक बँकांनी आपल्या ATM मध्ये मोबाईल रिचार्जची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा: आर्थिक नियोजनात फायद्याच्या ठरणाऱ्या ६ गोष्टी, जाणून घ्या

लोनची सुविधा
लोन घेण्यासाठीहो ATM मधून तुम्ही अप्लाय करू शकता. सध्या ICICI बँक आणि HDFC बँकेच्या ATM मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. पण लवकरच ही सुविधा सगळ्याच बँकांमध्ये उपलब्ध होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.

loading image
go to top