esakal | सोनं घ्या, सोनं... फक्त पाच रुपयांत! 
sakal

बोलून बातमी शोधा

gold

सध्या सोन्याचे भाव खूप वाढल्यामुळे आपली सोने खरेदी करण्याची ऐपत नाही असे काही जणांना वाटणे स्वाभाविक आहे.अॅमॅझॉनने अक्षरशः: एखादे चॉकलेट खरेदी करावे तेवढ्या किमतीचे सोने खरेदी करण्याची संधी दिली आहे.

सोनं घ्या, सोनं... फक्त पाच रुपयांत! 

sakal_logo
By
अतुल कहाते

हौस आणि गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून भारतीय लोक सोन्याकडे बघतात. जगात इतरत्रही सोन्यामध्ये काही प्रमाणात गुंतवणूक करण्याचा लोकांचा कल असतो खरा; पण भारतात किती तरी लोक सोन्यामधील गुंतवणूक हीच आपली मुख्य गुंतवणूक समजतात. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याचे भाव विलक्षण वेगाने वाढले आहेत. त्यामुळे लोक अधिकाधिक प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी धडपडताना दिसतात. आत्ता ही गुंतवणूक करणे योग्य आहे का, याविषयी निरनिराळी मते असली तरी ज्यांना अशी गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी एक अत्यंत सोयीचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘अॅमॅझॉन’ कंपनीचे नाव ऐकले की आपल्या नजरेसमोर हव्या त्या वस्तूच्या खरेदीचे दृश्य येते. आता हीच अॅमॅझॉन कंपनी आपल्याला सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. सध्या सोन्याचे भाव खूप वाढल्यामुळे आपली सोने खरेदी करण्याची ऐपत नाही असे काही जणांना वाटणे स्वाभाविक आहे. अॅमॅझॉनने अक्षरशः: एखादे चॉकलेट खरेदी करावे तेवढ्या किमतीचे सोने खरेदी करण्याची संधी दिली आहे. फक्त ५ रुपयांचे सोनेही आपण विकत घेऊ शकतो. यासाठी आपल्याला अॅमॅझॉन कंपनीचे ‘अॅमॅझॉन पे’ हे अॅप वापरावे लागेल. कुठल्याही स्मार्टफोनवर ते सहजपणे इन्स्टॉल करता येते. बसल्या जागी सोने खरेदी करण्याची सोय आपल्याला त्यातून मिळेल. तसेच आपल्याला हवे तेव्हा ते विकताही येईल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वैशिष्ट्य़े : 
- प्रत्यक्ष सोने आपल्याला मिळणार नाही; तर ‘डिजिटल गोल्ड’; म्हणजेच सोन्याच्या किमतीच्या मूल्याएवढी नोंद आपल्या ‘अॅमॅझॉन पे’च्या खात्यात होईल. 
- सोन्याच्या अद्ययावत भावानुसार दर ५ मिनिटांनी आपल्या सोन्यामधल्या गुंतवणुकीचे मूल्य वर-खाली होत राहील. 
- अत्यंत सुरक्षित, जोखीम-विरहित पर्याय; जोडीला अॅमॅझॉनसारख्या बलाढ्य कंपनीचे पाठबळ. 
- फक्त आपला स्मार्टफोन वापरून हे व्यवहार करणे शक्य. 
- चोरी, लॉकरवरचा खर्च, सोन्याच्या शुद्धतेविषयीच्या शंका यांना पूर्णविराम. 
- किमान ५ रुपयांपासून आपल्याला जमेल तेव्हा जमेल तितक्या रकमेचे सोने विकत घेत राहण्याचा पर्याय. 

loading image
go to top